-    अभिनेत्री रिंकू राजगुरुने अगदी कमी वयामध्येच चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. 
-    आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त रिंकू तिच्या लूकमुळे सतत चर्चेत असते. 
-    आता देखील तिने साडीमध्ये खास फोटोशूट केलं आहे. 
-    तिचं हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 
-    निळ्या रंगाची साडी, भरजरी ब्लाऊज तिने परिधान केलेला यामध्ये दिसत आहे. 
-    नाकात नथ, केसात गजरा, हातात हिरव्या बांगड्या आणि गळ्यात भरगच्च हार असा रिंकूचा लूक आहे. 
-    तिच्या या पारंपरिक लूकवर चाहतेही फिदा झाले आहेत. 
-    काही तासांमध्येच २० हजारांपेक्षा अधिक लोकांनी तिच्या या फोटोंना पसंती दर्शवली आहे. (सर्व फोटो – इन्स्टाग्राम) 
 
  राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  