-
झी मराठीवरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमाची सध्या संपूर्ण महाराष्ट्र चर्चा सुरु आहे.
-
नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
सुबोध भावे आणि महिला मंडळ हे अमृता फडणवीसांचा जीवन प्रवास उलगडणार आणि त्यांना पेचात टाकणारे काही प्रश्न देखील विचारणार आहेत.
-
या कार्यक्रमातील महिला मंडळाने त्यांना खूप गमतीशीर प्रश्न विचारले आणि त्यांनीही तेवढ्याच खुमासदार अशी उत्तरे दिली आहेत.
-
या तिसऱ्या भागात महिला मंडळाने विचारलेल्या गळ्यातील मंगळसूत्रबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर फारच खुमासदार पणे दिले.
-
‘तुम्ही गळ्यामध्ये मंगळसूत्र घातले नाही तर तुम्हाला सासूबाई ओरडत नाही का?’ असा प्रश्न अमृता फडणवीस यांना या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका महिलेने विचारला होता.
-
यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘मंगळसूत्र हे सौभाग्याचे प्रतिक असते. त्यामुळे आपल्या पतीने आपला गळा पकडण्यापेक्षा हातात हात धरला पाहिजे. म्हणूनच मी माझ्या हातात मंगळसूत्र घालायला लागली.’
-
अमृता फडणवीसांप्रमाणे बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री देखील हातात मंगळसूत्र घालतात.
-
मंगळसूत्र हा एक पवित्र दागिना मानला जातो जो हिंदू स्त्रिया लग्नानंतर घालतात.
-
फिटनेसकडे विशेष लक्ष देणारी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसुद्धा हातात मंगळसूत्र घालते.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने मंगळसूत्राच्या ब्रेसलेटला पसंती दिली आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासूसुद्धा हातात मंगळसूत्र घालते.
-
मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने देखील ब्रेसलेट मंगळसूत्राला पसंती दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल