-
मराठी-हिंदी चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून नेहा जोशीला ओळखले जाते.
-
नुकतंच नेहा जोशी ही विवाहबंधनात अडकली आहे. ओमकार कुलकर्णी असे तिच्या पतीचे नाव आहे.
-
नेहा आणि ओमकार यांचा विवाह नुकताच संपन्न झाला.
-
याचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पण तिने या लग्नाचा कोणताही गाजावाजा केला नाही.
-
अगदी घरगुती पद्धतीने, मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला.
-
अभिनेत्री नेहा जोशीचा पती ओमकार हा मराठी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेता आहे.
-
त्यासोबत तो लेखक आणि कवी देखील आहे.
-
नेहा ही ३८ वर्षांची असून ओमकार हा तिच्यापेक्षा एक वर्षांनी लहान आहे.
-
नुकतंच ‘ई-टाईम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत नेहाने गुपचूप लग्न का केले? याचा खुलासा केला आहे.
-
यात ती म्हणाली, “लग्न ही माझ्यासाठी अतिशय खाजगी बाब आहे आणि त्यामुळे यातील सर्व सोहळे हे मी माझ्यापुरती मर्यादित ठेवले.
-
“मी लग्न करणार असल्याची गोष्ट फारच खासगी ठेवायची होती, कारण मला तेच करायचे होते.”
-
“माझ्या कुटुंबातील सदस्यांसाठी आणि इतर जवळच्या लोकांसाठी मला एक साधे महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करायचे होते. “
-
“त्यानुसार आज (१७ ऑगस्ट) आम्ही लग्न केले आणि उद्या कोर्ट मॅरेज करुन रिसेप्शन करु”, असे नेहाने म्हटले.
-
नेहाच्या लग्नाचे सुदंर फोटोही आता समोर आले आहे. या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
-
मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत
-
नेहाने आतापर्यंत अनेक मराठी नाटक, मालिका आणि चित्रपटात भूमिका साकारली आहे.
-
‘वाडा चिरेबंदी’, ‘बेचकी’, ‘कनुप्रिया’ या नाटकात तिने फार उल्लेखनीय काम केले आहे. त्यासोबतच ‘झेंडा’, ‘पोश्टर बॉइज’, ‘लालबागची राणी’, ‘बघतोस काय मुजरा कर,’ अशा चित्रपटातही ती झळकली होती.

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक