-
अभिनेत्री श्रुती मराठे ही कायम तिच्या लुक्समुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
-
तिचा मराठमोळ्या साडीतल्या लूकचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
-
श्रुती ही तिच्या या स्पेशल साडी लूकसाठीच तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे.
-
या फोटोतसुद्ध नेहमीप्रमाणेच ती उत्तमरित्या साडी कॅरी करताना आपल्याला दिसते.
-
श्रुतीला मध्यंतरी तिच्या वजनावरून प्रचंड ट्रोल केलं जायचं, पण गेल्या काही महिन्यांमध्ये तिने स्वतःची फिगर उत्तमरित्या मेंटेन करून ट्रोलर्सना चांगलंच उत्तर दिलं आहे.
-
श्रुती ‘राधा ही बावरी’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली.
-
तसंच तिने दाक्षिणात्य चित्रपटातसुद्धा अत्यंत बोल्ड अशा भूमिका केल्या आहेत.
-
‘तप्तपदी’ आणि ‘सरसेनापती हंबीरराव’ अशा गाजलेल्या मराठी चित्रपटात श्रुतीच्या अभिनयाचं कौतुक झालं.
-
श्रुती तिच्या बोल्ड लूक आणि मोहक हास्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावरचे तिचे फोटो चांगलेच व्हायरल होतात.
-
या साडीतला श्रुतीचा फोटोसुद्धा प्रचंड व्हायरल झाला होता.
-
एकंदरच साडी ही भारतीय वेशभूषा उत्तम कॅरी करण्यात श्रुतीचा हात कुणीच धरू शकत नाही असं तिच्या चहत्यांचं म्हणणं आहे.
-
श्रुती ढोल-ताशा पथकातसुद्धा सक्रिय असते. तिचे ढोल वादन करतानाचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.(फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक