-
गेली बरीच वर्षं दिग्दर्शक अयान मुखर्जी ज्या चित्रपटावर मेहनत घेत आहे तो ‘ब्रह्मास्त्र’ येत्या महिन्यात ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. निर्माते, कलाकार तसेच दिग्दर्शक यांना हा चित्रपट तिकिटबारीवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.
-
‘लाइगर’ हा साऊथचा अभिनेता विजय देवरकोंडाचा पहिला हिंदी चित्रपट पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडूनही बऱ्याच अपेक्षा आहे. अभिनेत्री अनन्या पांडे यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
अक्षय कुमारचा ‘राम सेतु’ हा चित्रपटदेखील यावर्षी प्रदर्शित होणार आहे. अक्षयचे सध्या सगळेच चित्रपट आपटले असल्याने या चित्रपटाकडून अक्षयला बऱ्याच अपेक्षा आहेत.
-
साऊथचा ‘विक्रम वेधा’ या चित्रपटाचा हिंदी रिमेकही यावर्षीच प्रदर्शित होणार आहे. यात सैफ अली खान आणि हृतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हृतिकने आमिरच्या चित्रपटाचे कौतुक केल्याने बॉयकॉट विक्रम वेधा हा ट्रेंडदेखील सध्या व्हायरल होत आहे.
-
‘सर्कस’विषयीसुद्धा चांगलीच चर्चा सुरू आहे. खूप मोठ्या स्टारकास्टसह प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाकडून रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांना अपेक्षा आहेत. माझे चित्रपट चांगली कमाई करतील असा आत्मविश्वास रोहित शेट्टीने व्यक्त केला आहे.
-
वरुण धवनच्या आगामी ‘भेडिया’कडूनदेखील बऱ्याच अपेक्षा आहेत. बदलापूरनंतर बऱ्याच वर्षांनी वरुण पुन्हा एका वेगळ्या अवतारात दिसणार आहे.
-
टायगर श्रोफच्या ‘गणपत’ची सुद्धा चांगलीच हवा आहे. हा चित्रपटही याचवर्षी प्रदर्शित होणार असून क्रीती सनन यामध्ये महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
-
लोकप्रिय दिग्दर्शक सुरज बडजात्या हे बऱ्याच वर्षांनी दिग्दर्शनाकडे वळले आहेत. त्यांच्या आगामी ‘उंचाई’ या चित्रपटाकडून सगळ्यांनाच खूप अपेक्षा आहेत. अमिताभ बच्चन, बोमन इराणी, डॅनी डेंजोप्पा, परिणीती चोप्रा, नीना गुप्ता, सारिका अशी दिग्गज मंडळी यात आपल्याला बघायला मिळणार आहेत.
-
‘शेरशाह’सारखा उत्कृष्ट चित्रपट केल्यानंतर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘योद्धा’ची उत्सुकता आहे. शेरशाहप्रमाणेच या चित्रपटातसुद्धा सिद्धार्थ एका तगड्या भूमिकेत दिसणार आहे.
-
मल्याळम दृश्यम २ आल्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागलेली ती हिंदी रिमेकची. कारण निशिकांत कामत दिग्दर्शित पहिल्या भागाला लोकांनी अप्रतिम प्रतिसाद दिला होता. या वर्षाअखेरीस अजय देवगण याच्या दुसऱ्या भागाचा रिमेक आपल्यासाठी घेऊन येत आहे. या चित्रपटाकडूनही लोकांना खूप अपेक्षा आहेत. (फोटो सौजन : इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग