-
आज साऊथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा ६७ वा वाढदिवस आहे. आज त्यांच्याचविषयी आपण काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.
-
आजच्याच दिवशी त्यांच्या आगामी ‘गॉडफादर’ या चित्रपटाचं टीझर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या चित्रपटात त्यांच्याबरोबर बॉलिवूडचा भाईजान सलमान खानदेखील झळकणार आहे.
-
चिरंजीवी यांनी आपल्या करकीर्दीमध्ये एकाहून एक हीट आणि सरस असे चित्रपट केले आहेत.
-
चिरंजीवी यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरुवात १९७८ मध्ये आलेल्या ‘प्रणाम खरीदू’ या चित्रपटापासून केली होती.
-
अगदी कमी वेळात त्यांनी स्वतःची छाप तेलुगू चित्रपटसृष्टीवर पाडली. नंतर हळूहळू त्यांनी कन्नड आणि हिंदी चित्रपटातही काम करायला सुरुवात केली.
-
१९९२ मध्ये आलेल्या ‘घराना मोगुदु’ या चित्रपटादरम्यान चिरंजीवी हे भारतातले एकमेव महागडे अभिनेते झाले होते.
-
असं म्हंटलं जातं की त्याकाळात त्यांनी अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकलं होतं. जिथे बच्चनजी एका चित्रपटासाठी १ करोंड मानधन घ्यायचे तिथे चिरंजीवी १.५ करोड मानधन घेत असत.
-
वेगवेगळे चित्रपट पुरस्कार त्यांना मिळाले आहेतच. याबरोबरच त्यांना ‘पद्मभूषण’ या तिसऱ्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले आहे.
-
चिरंजीवी यांनी अभिनयाप्रमाणे राजकारणातसुद्धा नशीब आजमावलं आहे.
-
२००८ मध्ये त्यांनी प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत चिरंजीवी यांच्या पार्टीला १८ जागांवर विजय मिळाला होता. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस आणि इन्स्टाग्राम)

“दिलखुलास हसणारी आमची आई…”, तेजस्विनी पंडितला मातृशोक, ज्योती चांदेकर यांनी ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…