-
‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकताच तिचा खास गणेशोत्सव लुक सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
-
या फोटोजमध्ये रिंकू पारंपरिक मराठमोळ्या अवतारात आपल्याला दिसत आहे.
-
अत्यंत आनंदाने तिने गणरायचे स्वागत केले आहे.
-
अत्यंत भक्तिभावाने रिंकू गणरायाची पूजा करतानाचे ही फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
या पोस्टमध्ये रिंकूने ढोल वादनाचे फोटोजही शेअर केले आहेत.
-
ढोल वादन करताना तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान फोटोमध्ये अगदी योग्य टिपलं आहे.
-
गुलाबी माराठमोळी साडी आणि वेगवेगळे दागिने यामुळे तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे.
-
रिंकूचा हा लूक तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
-
रिंकूने नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटातून पदार्पण केलं. चित्रपटाने एक वेगळाच इतिहास रचला.अगदी बॉलिवूडलाही या चित्रपटाची दखल घ्यावी लागली.
-
‘सैराट’मध्ये काम करत असताना ती शाळेत शिकत होती. एवढी लोकप्रियता मिळूनही ती दहावीच्या परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाली.
-
“मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू?” हा रिंकूचा डायलॉग प्रचंड गाजला.
-
रिंकूने नंतर २०० हल्ला हो, कागर अशा वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं आहे. यामध्ये तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली. (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

करिष्मा हगवणेची महिला आयोगाकडे तक्रार; चाकणकरांनी काय सांगितलं? Vaishnavi Hagwane Case