-
समांथा आणि नागा चैतन्य दक्षिणेतील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल होतं.
-
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये घटस्फोट घेतला.
-
नागा चैतन्य आणि समांथाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती.
-
दोघांच्या घटस्फोटाला वर्ष होत आलंय, परंतु सोशल मीडियावर त्यांची चर्चा कायम होत असते.
-
त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयाचा केवळ चाहत्यांनाच नाही तर इंडस्ट्रीतील कलाकारांनाही धक्का बसला होता.
-
समांथा आणि नागा चैतन्य यांनी घटस्फोट घेताना कोणतंही कारण दिलं नव्हतं. दोघांनीही विचार करून हा निर्णय घेतल्याचं सोशल मीडियावर सांगितलं होतं.
-
दरम्यान घटस्फोटाच्या या वर्षभरात कोणत्या ना कोणत्या कारणांवरून या दोघांच्या नात्याची चर्चा सुरूच असते.
-
समांथा आणि नागा चैतन्य दोघंही त्यांच्या घटस्फोटावर भाष्य करणं टाळतात.
-
दरम्यान, दोघांचं नातं सामान्य होण्याच्या पलीकडे गेलं होतं, त्यामुळे घटस्फोट घेतल्याचं समांथाने कॉफी विथ करणमध्ये म्हटलं होतं.
-
समांथा आणि नागा चैतन्यचे चाहते त्यांचे लग्नाचे आणि एकमेकांबरोबरचे इतर फोटोज शेअर करत असतात.
-
अशातच आता समांथाचे वडील जोसेफ प्रभू यांनी फेसबूकवर एक पोस्ट शेअर केली आहे.
-
त्यांची ही पोस्ट सर्वांचंच लक्ष वेधून घेत असून त्यांनी समांथा आणि नागा चैतन्य यांच्या नात्याबद्दल भूमिका मांडली आहे.
-
फोटो शेअर करताना प्रभू यांनी लिहिलं की, “खूप पूर्वी एक गोष्ट होती. आणि ती यापुढे अस्तित्वात नाही! त्यामुळे, चला एक नवीन गोष्ट आणि एक नवीन अध्याय सुरू करुयात!”
-
जोसेफ प्रभू यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी आणि हितचिंतकांनी कमेंट्स केल्या आहेत.
-
या कमेंट्सला उत्तर देत ते म्हणाले, “तुमच्या सर्व भावनांसाठी धन्यवाद. होय, भावनांवर मात करण्यासाठी मी बराच काळ बसून राहिलो. पण जुन्या आठवणी, भावना घेऊन बसून राहण्यासाठी आणि अडकून पडण्यासाठी आयुष्य खूप लहान आहे.”
-
घटस्फोटानंतर समांथा पुष्पा २ सह तिच्या इतर आगामी चित्रपटांच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.
-
तर, नागा चैतन्यदेखील चित्रपटांचे शुटिंग करतोय.
-
(सर्व फोटो संग्रहित आणि फेसबूकवरून साभार)

Mumbai Metro: मुंबईतील नव्या मेट्रो स्थानकात किळसवाणं कृत्य; व्हायरल VIDEO वर मुंबईकरांचा संताप