-
सावळ्या रंगामुळे अनेक कलाकारांना भूमिका नाकारण्यात आल्याचं आपल्या नेहमीच ऐकिवात असतं.
-
पण गोऱ्या रंगामुळे करिअर पणाला लागण्याचा अनुभव एका अभिनेत्रीला आला आहे.
-
पाकिस्तानी अभिनेत्री मोमिना इकबालने काही दिवसांपूर्वीच तिच्या करिअरबद्दल बोलताना धक्कादायक खुलासा केला आहे.
-
खूप जास्त गोऱ्या रंगाच्या त्वचेमुळे मोमिनाला करिअरच्या सुरुवातील अनेक भूमिका नाकारण्यात आल्या आहेत.
-
एका मुलाखतीत मोमिनाने सांगितलं, “माझे सहकलाकार कोणत्याच अँगलमधून माझ्यासह स्क्रीनवर दिसणं पसंत करत नव्हते.”
-
“ऑनस्क्रीन माझा हात पकडण्यातही त्यांना समस्या होती कारण माझ्या नितळ त्वचेमुळे त्यांची त्वचा टॅन दिसेल अशी भीती त्यांना वाटायची” असंही मोमिना म्हणाली.
-
या मुलाखतीत ती पुढे म्हणाली, “माझ्यासह काम करणारे अभिनेतेच नाही तर अभिनेत्रीही माझ्या रंगामुळे मला ऑनस्क्रीन हात लावण्यास नकार द्यायच्या.”
-
एवढंच नाही तर मोमिनाला करिअरच्या सुरुवातील सौंदर्यामुळे भूमिका मिळतात अशा आशयाचे टोमणेही ऐकावे लागले होते.
-
मोमिना म्हणते, “या सर्व गोष्टींचा मला खूप त्रास झाला होता. पण आता इंडस्ट्रीमधील परिस्थिती पूर्वीसारखी राहिलेली नाही.”
-
मोमिनाने ‘अजनबी लगे जिंदगी’, ‘इश्क में काफिर’, ‘खुदा और मोहब्बत सीजन 3’, ‘मेरे हमनशीं’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.
-
मोमिना इकबालने तिच्या करिअरची सुरुवात ‘पार्लरवाली लडकी’ या टीव्ही मालिकेतून केली होती.
-
(फोटो साभार- मोमिना इकबाल इन्स्टाग्राम)

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग