-
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे आज म्हणजेच २१ सप्टेंबर २०२२ रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. (Photo: Indian Express)
-
गेल्या एक महिन्यापासून तब्येत खालावली होती. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. (Photo: Raju Srivastava/ Instagram)
-
पण तुम्हाला माहिती आहे का, राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव काही वेगळे होते आणि त्यांचे अभिनेता अनिल कपूरसोबतही खास नाते होते. (Photo: Raju Srivastava/ Instagram)
-
आज आपण राजू श्रीवास्तव यांच्याबद्दल काही अज्ञात गोष्टी जाणून घेऊया. (Photo: Indian Express Archive)
-
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, राजू श्रीवास्तव यांना ‘ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज; या रिअॅलिटी टीव्ही शोमधून ओळख मिळाली. हा शो २००५ मध्ये आला होता. (Photo: Indian Express Archive)
-
रिअॅलिटी टीव्ही शो करण्याआधी राजू श्रीवास्तव यांनी ‘मैने प्यार किया’, ‘बाजीगर’ आणि ‘आमदानी अथनी खरखा रुपैया’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Photo: Indian Express Archive)
-
तसेच, त्यांनी ‘अदालत’ आणि ‘शक्तिमान’ सारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. (Photo: Raju Srivastava/ Instagram)
-
राजू श्रीवास्तव अनेक शो आणि चित्रपटांचा भाग राहिले आहे आणि या यादीत बिग बॉसचे नावचादेखील समावेश आहे. (Photo: Vindu Dara Singh/ Instagram)
-
राजू श्रीवास्तव बिग बॉसच्या तिसऱ्या सीझनमध्ये दिसले होते. (Photo: Raju Srivastava/ Instagram)
-
राजू श्रीवास्तव आणि अनिल कपूर यांच्यात खास नाते आहे. खूप कमी लोकांना माहित आहे की राजू श्रीवास्तव यांनी १९८८ मध्ये आलेल्या अनिल कपूरच्या तेजाबमधून पदार्पण केले होते. (Photo: Indian Express Archive)
-
राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव राजू नसून काहीतरी वेगळे होते हे तुम्हाला माहीत आहे का? (Photo: Raju Srivastava/ Instagram)
-
राजू श्रीवास्तव यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ रोजी कानपूरमध्ये झाला होता आणि त्यांचे खरे नाव सत्य प्रकाश श्रीवास्तव होते. (Photo: Raju Srivastava/ Instagram)

गायक राहुल देशपांडेंचा घटस्फोट, १७ वर्षांच्या संसारानंतर पत्नीपासून विभक्त