-
बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींनी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं. परंतु त्या अभिनेत्री नंतर बिझनेसकडे वळल्या किंवा काहींनी स्वतःचे ब्रँड सुरू केले, तर काही गृहीणी बनल्या.
-
पण, एक अभिनेत्री अशी पण होती जिने आपलं यशस्वी करिअर सोडून भिक्षू होण्याचा निर्णय घेतला.
-
फोटोंवरून तुम्ही तिला ओळखलं नसेल. तर या अभिनेत्रीचं नाव आहे बरखा मदान.
-
बरखा मदानने १० वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडलं आणि ती बौद्ध भिक्षू बनली. आता ती तिचा बहुतांश वेळ हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे घालवते.
-
-
बरखा मदनने केवळ बौद्ध धर्म स्वीकारला नाही तर तिचे नावही बदलले. तिने नावंही बदलून ग्याल्टेन सॅमटेन (Gyalten Samten) ठेवले आहे.
-
बरखा मदान एकेकाळी लोकप्रिय मॉडेल होती. ती १९९४च्या मिस इंडिया स्पर्धेत विजेत्या सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांच्यासह अंतिम फेरीत सहभागी झाली होती.
-
बरखाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात अक्षय कुमारबरोबर ‘खिलाडी का खिलाडी’ या चित्रपटातून केली होती. त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
-
बरखाने बॉलिवूडसह परदेशी आणि पंजाबी चित्रपटही केले.
-
राम गोपाल वर्माच्या भूत चित्रपटामध्ये तिने साकारलेली भुताची भूमिका तिच्या लोकप्रिय भूमिकांपैकी एक आहे.
-
पण नंतर अचानक बरखा मदनचे ग्लॅमर इंडस्ट्रीतील आकर्षण कमी झाले व ती नन बनली.
-
नन झाल्यानंतर तिने बौद्ध धर्म स्वीकारला आणि आता ती बौद्ध भिक्षू म्हणून आपले जीवन जगत आहे.
-
(Photos: Barkha Madaan Facebook and Social Media)

‘बायकोला नाचताना पाहून पती लाजला…’, हळदीच्या कार्यक्रमातील VIDEO होतोय तुफान व्हायरल