-
आज २३ सप्टेंबर, मराठी सिनेसृष्टीत आजच्या दिवशी एका सोनेरी पानाचा उगम झाला. आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
आज याला ३४ वर्ष पूर्ण झाली. ‘अशी ही बनवाबनवी’ या मराठी चित्रपटाला ५० आठवडे चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचं प्रेम मिळत होतं. या चित्रपटाच्या ‘गोल्डन ज्युबिली’चा शो खूप गाजला.
-
या चित्रपटातील अनेक डायलॉग आजही फार प्रसिद्ध आहेत.
-
‘धनंजय माने इथेच राहतात का’, ‘५० रुपये वारले’, ‘लिंबू कलरची साडी’ या डायलॉगची अजूनही लोकांमध्ये तितकीच क्रेझ आहे.
-
याच चित्रपटातील अनेक प्रसिद्ध डायलॉगमधील अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक डायलॉग तुम्हाला आठवतोय का? ‘हा माझा बायको पार्वती’ असे अशोक सराफ यांनी या चित्रपटात म्हटले होते. त्यानंतर हा संवाद प्रचंड हिट ठरला होता.
-
अशोक सराफ यांनी म्हटलेल्या ‘हा माझा बायको पार्वती’ या डायलॉगचा एक वेगळाच चाहता वर्ग आहे.
-
पण तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की चित्रपटाच्या मूळ स्क्रिप्टमध्ये हा डायलॉग नव्हताच, असे अशोक मामांनीच एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते.
-
एका मुलाखतीदरम्यान त्यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “लक्ष्या आणि माझी फार घट्ट मैत्री होती. अनेकदा त्याच्याबद्दल एखाद्याशी बोलताना हा बघ असे सहज निघून जायचे. मला ती सवयच लागली होती.”
-
“त्यामुळे जेव्हा या चित्रपटात लक्ष्याने पार्वती हे स्त्री पात्र साकारले तेव्हा त्याचा उल्लेख मी ‘ही माझी बायको पार्वती’ असं करण्याऐवजी ‘हा माझा बायको पार्वती’ असा केला.”
-
“तो चुकून म्हटला गेलेला डायलॉग फार हिट ठरला. आज तुम्ही ज्या डायलॉगचे अनेक मीम्स, टीशर्ट प्रिंट पाहायला मिळत आहेत तो खरंतर स्क्रिप्टमध्येही नव्हता,” असेही अशोक सराफ यांनी सांगितले.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”