-
अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
-
रिचा-अलीचं लग्न कुठे पार पडणार, बॉलिवूडमधल्या कोणत्या कलाकारांना आमंत्रिक केलं गेलंय, हे सर्व जाणून घेण्याची चाहत्यांना फार उत्सुकता आहे.
-
काही दिवसांपूर्वीच या दोघांच्या लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल झाला होता.
-
त्यानंतर यांच्या लग्नाची नियमावली समोर आली आहे.
-
हल्ली सेलिब्रिटींच्या लग्नसोहळ्यात ‘नो मोबाइल फोन पॉलिसी’ खूपच वापरली जात आहे
-
सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल होऊ नये यासाठी हा नियम लावला जातो.
-
मात्र अली आणि रिचाने त्यांच्या लग्नात पाहुण्यांना मोबाईल वापरण्याची मुभा दिली आहे.
-
पण पाहुणे मंडळी हातात मोबाइल फोन असला तरी रिचा-अलीच्या लग्नाचे फोटो क्लिक करू शकणार नाहीत.
-
ही एकच अट या दोघांकडून पाहुण्यांना घालण्यात आली आहे.
-
२०१५ पासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
-
३० सप्टेंबरपासून रिचा आणि अलीच्या लग्नाच्या कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे.
-
६ ऑक्टोबर रोजी हे दोघं लग्नगाठ बांधणार आहेत.

Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…