-
मराठीतला प्रसिद्ध गायक, संगीतकार अवधूत गुप्ते सध्या चर्चेत आहेत.
-
सध्या तो चर्चेत आला आहे ते म्हणजे मराठी गरबा या कार्यक्रमामुळे., मराठी दांडिया महोत्सव सध्या मुंबईत सुरु आहे. या कार्यक्रमात तो सहभागी झाला आहे.
-
मराठी दांडिया महोत्सव मुंबईत काळाचौकी परिसरात सुरु आहे. या गरब्याचे आयोजन भारतीय जनता पार्टीने केले आहे.
-
अवधूत गुप्ते सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाने आज घराघरात पोहचला आहे. या कार्यक्रमाने त्याला एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
-
३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबरपर्यंत हा गरबा महोत्सव आहे. या महोत्सवाला हजारो लोकांची उपस्थिती असते. या कार्यक्रमाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
या महोत्सवाला बॉलिवूड सेलिब्रेटीदेखील उपस्थित होते, नुकतेच अक्षय कुमारने आपली हजेरी लावून प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित झाला.
-
अक्षय कुमारच्या बरोबरीने या महोत्सवाला रणवीर सिंगने हजेरी लावली होती.
-
रणवीर सिंगने या महोत्सवात देवीचे दर्शन घेतले.
-
रणवीर सिंगने हातात माईक घेऊन गाणेदेखील गायले.
-
बॉलिवूडच्या दबंग खानने म्हणजे सलमान खाननेदेखील उपस्थित राहून लोकांना खुश केले.
-
केवळ अभिनेतेच नव्हे तर या महोत्सवाला अभिनेत्रींनीदेखील आपली उपस्थिती दर्शवली.
-
अभिनेत्री अनन्या पांडे आणि मराठीमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर या दोघी उपस्थित होत्या. फोटो सौजन्य : अवधूत गुप्ते / इन्स्टाग्राम

VIDEO: रामायणानंतर पहिल्यांदाच जिवंत दिसले जटायू? रस्त्याच्या कडेला बसलेल्या जटायूचं रूप पाहून हैराण व्हाल; लोकांनी काय केलं पाहा