-
६ ऑक्टोबर १९४६ मध्ये पेशावर येथ जन्मलेल्या विनोद खन्ना यांची ओळख करून द्यायची काहीच गरज नाही.
-
आपल्या कारकिर्दीत एकाहून एक सरस आणि उत्तम असे चित्रपट देणाऱ्या विनोद खन्नासाठी भारतीय प्रेक्षकांच्या मनात एक विशेष जागा आहे.
-
तब्बल १५० चित्रपटात काम करणारे विनोद खन्ना यांनी त्यावेळी बॉलिवूडच्या अँग्री यंग मॅन म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या तोडीस तोड भूमिका साकारल्या होत्या.
-
हेरा फेरी, अमर अकबर अॅंथनी, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटात तर विनोद खन्ना यांनी बच्चनलासुद्धा खाऊन टाकलं होतं.
-
पेशावर ते दिल्ली आणि मग पुढील शिक्षणासाठी दिल्ली ते मुंबई असा प्रवास करत विनोद खन्ना यांनी मुंबईत तळ ठोकला आणि नाटकात भाग घ्यायला त्यांनी सुरुवात केली.
-
खरंतर विनोद खन्ना यांना क्रिकेटर व्हायचं होतं. पण जेव्हा त्यांनी अभिनयात नशीब आजमावायचं ठरवलं तेव्हा घरच्यांकडून त्यांना केवळ २ वर्षांची मुदत मिळाली होती.
-
‘पूरब और पश्चिम’, ‘मेरा गांव मेरा देश’, ‘सच्चा झूठा’ अशा काही चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती.
-
मुंबईत नाटकात काम करताना विनोद खन्ना यांची गीतांजलीशी ओळख झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नदेखील केलं.
-
त्यांची मुलं अक्षय खन्ना आणि राहुल खन्ना. यापैकी अक्षय खन्नानेही चित्रपटसृष्टीत स्वतःचं असं स्थान निर्माण केलं आहे.
-
विनोद खन्ना हे अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांसाठीसुद्धा चर्चेत असायचे. ‘दयावान’ चित्रपटातील एका रोमॅंटिक सीनमध्ये विनोद खन्ना यांचं स्वतःवरचं नियंत्रण सुटलं होतं. या चित्रपटात विनोद यांच्याबरोबर अभिनेत्री माधुरी दीक्षित होती. या प्रकरणाची चर्चा आजही होते. शूटिंग दरम्यान त्यांचा स्वतःवर ताबा नसायचा अशी तक्रार तेव्हाच्या बऱ्याच अभिनेत्रींनी केली होती.
-
७०-८० च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या बरोबरीनेच विनोद खन्ना यांची लोकप्रियता वाढत होती, तेव्हा मात्र त्यांनी अचानक अभिनयातून संन्यास घेतला. त्यांना स्वतःच्या आयुष्यात रितेपण जाणवायला लागलं होतं.
-
नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं असूनही केवळ स्वतःच्या आंतरिक सुख आणि समाधानासाठी विनोद यांनी अभिनयातून संन्यास घेतला आणि अमेरिकेतील ओशो यांचा आश्रम गाठला. २७ एप्रिल २०१७ रोजी ब्लड कॅन्सरमुळे या एवरग्रीन सुपरस्टारचं निधन झालं. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली