-
मराठीमध्ये सध्या ‘हर हर महादेव’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटाची चर्चा सुरु आहे.
-
काही तासांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
-
चित्रपटाच्या ट्रेलरला काही तासांमध्येच लाखो लोकांनी पसंती दर्शवली.
-
मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली असताना ‘हर हर महादेव’ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या चित्रपटामध्ये मराठीमधील सुप्रसिद्ध चेहरे काम करताना दिसणार आहेत.
-
शरद केळकर बाजीप्रभू देशपांडे तर अमृता खानविलकर बाजीप्रभू यांच्या पत्नीची भूमिका साकारताना दिसेल.
-
हार्दिक जोशी, शरद पोंक्षे यांचीही या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका आहे.
-
अभिनेता सुबोध भावे ‘हर हर महादेव’मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.
-
याआधी मराठीमधील काही अभिनेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली.
-
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेमधील सुबोध प्रेक्षकांना पटला नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
-
‘हर हर महादेव’चा ट्रेलर पाहिल्यानंतर शरद केळकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला हवी होती, शंतनू मोघेनेही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका उत्तम साकारली असती अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. (सर्व फोटो – युट्युब, इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL