-
अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही गेले काही दिवस खूपच चर्चेत आहे. याचे कारण तिचे चित्रपट नसून सुकेश चंद्रशेखरचा 200 कोटींचा घोटाळा हे आहे. या प्रकरणार जॅकलिनचेही नाव आले होते.
-
आता जॅकलिनचा एक नवा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तिच्या आलिशान घराची झलक दिसली.
-
गौरी खानच्या ‘ड्रीम होम’ या शोच्या नव्या भागात जॅकलिन सहभागी झाली होती, त्याचा हा प्रोमो आहे.
-
त्यात गौरी खान जॅकलिनच्या घरी जाऊन तिच्या आवडीनिवडी जाणून घेताना दिसतेय. तसेच त्यांच्या मागे संपूर्ण भिंतभर काही हटके वस्तू आणि पुस्तकं ठेवलेली दिसत आहेत.
-
तसेच जॅकलिनच्या एका बेडरुमची झलकही यात दाखवण्यात आली आहे. खूप प्रशस्त अशी ही बेडरूम आहे.
-
पांढऱ्या शुभ्र रंगाचे इंटीरिअर असलेली ही खोली पाहून गौरी खान मोहित झाली.
-
तिला जॅकलिनचे घर प्रचंड आवडले असून आता गौरी तिच्या घराचे इंटीरिअर करणार आहे.
-
याआधी गौरी खानने मनिष मल्होत्रा, कबीर खान यांचीही घरं डिझाइन केली आहेत.
-
त्यानंतर आता गौरी खान जॅकलिन फर्नांडिसच्या घराचे इंटीरिअर डिझाइन करत आहे.

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक