-
आमिर खान ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला.
-
त्याने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील केले, परंतु बहिष्कारामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही.
-
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनी चित्रपटगृहाकडे पाठ फिरवली.
-
‘लाल सिंग चड्ढा’ ६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ठरलेल्या तारखेच्या आधीच हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.
-
आता ‘लाल सिंह चड्ढा’ला ओटीटीवर खूप प्रेम मिळत आहे. गंमत म्हणजे हा चित्रपट केवळ भारतातच नाही तर हिंदी व्यतिरिक्त इतर भाषेतही कमाल कामगिरी करत आहे.
-
‘लाल सिंग चड्ढा’ हा एका आठवड्यात नेटफ्लिक्सवर नंबर १ आणि भारतातील नंबर २ नॉन-इंग्लिश चित्रपट बनला आहे.
-
हा चित्रपट संपूर्ण जगभरातून ६.६३ दशलक्ष तास पाहिला गेला आहे
-
मॉरिशस, बांगलादेश, सिंगापूर, ओमान, श्रीलंका, बहरीन, मलेशिया आणि दुबई यासह जगभरातील १३ देशांमधील चित्रपटांमध्ये पहिल्या १० मध्ये याचा आहे.
-
या आठवड्याच्या जागतिक नॉन-इंग्लिश चित्रपटांच्या यादीत चार भारतीय चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे आणि या यादीत ‘लाल सिंह चड्ढा’चे नावही आहे.
-
आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
-
मात्र आमिर खानच्या एका जुन्या वक्तव्यामुळे हा चित्रपट वादात सापडला.
-
सुमारे १८० कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला हा चित्रपट थिएटरमध्ये फक्त ७० कोटींची कमाई करण्यात यशस्वी झाला होता.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग