-
गायिका नेहा कक्कर आणि तिचा पती रोहनप्रीत सिंग यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला.
-
पण यावेळी दिवळीच लग्नाचा वाढदिवस असल्याने नेहा आणि रोहनप्रीतचं हे डबल सेलिब्रेशन ठरलं.
-
नेहा कक्करने या सेलिब्रेशनचे फोटो शेअर करताना लिहिलं, लग्नाच्या २ वाढदिवसाच्या आम्हाला शुभेच्छा आणि दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा.
-
नेहा कक्करने तिच्या इन्स्टाग्रामवर या डबल सेलिब्रेशनचे बरेच फोटो शेअर केले आहेत.
-
नेहा कक्करच्या दिवाळी आणि लग्नाच्या वाढदिवसाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
नेहा कक्कर आणि रोहनप्रीत यांच्या या सेलिब्रेशनला दोघांच्याही कुटुंबाची उपस्थिती होती.
-
फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये नेहा कक्करने या सेलिब्रेशनसाठी सर्वांच्या कपड्याचं डिझाइन स्वतःचं केल्याचाही खुलासा केला.
-
नेहा कक्करने शेअर केलेल्या या फोटोंवर कमेंट करताना तिचा भाऊ टोनी कक्करने या आउटफिट्ससाठी तिचे आभार मानत तिच्या कौशल्याचं कौतुक केलं आहे.
-
दरम्यान नेहा कक्कर नेहमीच सोशल मीडियावर सक्रीय असते. सध्या ती इंडियन आयडॉलची परीक्षक म्हणून काम करत आहे.
-
नेहाने रोहनप्रीत सिंगशी २४ ऑक्टोबर २०२० मध्ये लग्न केलं होतं. ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.
-
(फोटो साभार- नेहा कक्कर, रोहनप्रीत सिंग इन्स्टाग्राम)

‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक