-
काटक शरीरयष्टी आणि पन्नाशी नंतरही कमालीच्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या मिलिंद सोमण आज ५७ वर्षांचा झाला.
-
मॅरथॉनमध्ये भाग घेणं असो, न्यूड फोटोशूट असो किंवा राजकीय मत मांडणं असो मिलिंद कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो.
-
मिलिंदच्या इतर गोष्टींप्रमाणे त्याच्या लग्नाचीसुद्धा चांगलीच चर्चा झाली. पत्नी अंकिताबरोबरचेदेखील तो फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतो.
-
मिलिंद सोमणने बऱ्याच चित्रपटात उत्तम काम केलं आहे, पण बॉलिवूडच्या एका चित्रपटातून त्याने काढता पाय घेतला होता. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
-
आमिर खानच्या १९९२ च्या ‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटासाठी मिलिंद शूटिंग करत होता आणि एकाएकी त्याने तो चित्रपट सोडला होता.
-
‘मेड इन इंडिया’ या आत्मचरित्रात मिलिंदने याबाबतीत खुलासा केला आहे.
-
या चित्रपटात मिलिंदला दीपिक तिजोरीच्या भूमिकेसाठी घेण्यात आलं होतं.
-
चित्रपटाच्या सेटवर ब्रेकफास्ट वेळेवर मिळाला नाही म्हणून हातातील सायकल बाजूला ठेवून मिलिंद सोमण या चित्रपटातून बाहेर पडला होता.
-
त्यावेळी सेटवर सगळे वेळ मिळेल तसा नाश्ता करायचे त्यामुळे ही पद्धत मिलिंदला आवडायची नाही.
-
याविषयी बोलताना मिलिंद म्हणाला, “मी एखादी गोष्ट करतो त्यात मला आनंद मिळाला पाहिजे, तसं होत नसेल तर मग काही अर्थ नाही. एखाद्या मोठ्या चित्रपटात काम करण्यापेक्षा कामाचा आनंद मिळणं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”
-
दीपक तिजोरीनेदेखील बॉलिवूड हंगामामध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा केला होता.
-
मिलिंदने तब्बल ७५% चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं, आणि एकदम तो सोडून गेल्याने फारच तारांबळ उडाल्याचं दीपकने सांगितलं. आज ‘जो जिता वही सिकंदर’ हा एक कल्ट क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

Daily Horoscope: रेवती नक्षत्रात ‘या’ राशींच्या पदरात पडेल यश तर कोणाला ऐनवेळी घ्यावे लागतील निर्णय; वाचा तुमचे राशिभविष्य