-    बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान व भारतीय क्रिकेटर शुबमन गिल एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. 
-    शुबमन व साराला अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटदेखील करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीच सारा व शुबमनचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. 
-    डेटिंगच्या चर्चांना उधाण आल्यानंतर आता अखेर शुबमननेच याबद्दल मौन सोडत भाष्य केलं आहे. 
-    शुबमन गिलने नुकतीच ‘दिल दिया गल्ला’ या पंजाबी शोमध्ये हजेरी लावली. 
-    सोनम बजेवा होस्ट करत असलेल्या या शोमध्ये शुबमनला “बॉलिवूडमधील सगळ्यात तंदुरुस्त अभिनेत्री कोण?” असा प्रश्न विचारण्यात आला. 
-    यावर उत्तर देताना शुबमनने क्षणाचाही विलंब न करता सारा अली खानचं नाव घेतलं. 
-    त्यानंतर “सारा अली खानला तू डेट करत आहेस का?”, असा प्रश्न शुबमनला विचारण्यात आला. 
-    शुबमन यावर उत्तर देत “कदाचित” असं म्हणाला. त्यानंतर होस्टने “सारा का सारा सच बोलो”, असं म्हटल्यावरही शुबमन थोडं कोड्यातच उत्तर दिलं. 
-    तो म्हणाला, “सारा दा सारा सच बोल दिया. कदाचित हो, कदाचित नाही”. 
-    त्यामुळे शुबमनने व सारा खान डेट करत आहे की नाही, याबद्दल अजूनही संभ्रम कायम आहे. परंतु, त्याने सारा अली खानला डेट करत असल्याच्या चर्चा नाकारल्याही नाहीत. 
-    सारा अली खानने शुबमन गिलला डेट करत असल्याच्या चर्चांवर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (सर्व फोटो : शुबमन गिल, सारा अली खान/ इन्स्टाग्राम) 
 
  Asia Cup 2025: युएईच्या कर्णधाराचा वर्ल्ड रेकॉर्ड, टी-२० इतिहासात ही कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  