-
आमिर खानचा यावर्षी प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. आमिरच्या कारकीर्दीतील हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट ठरला.
-
नुकतंच यामुळे आमिरने काही काळ अभिनयातून ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. एका कार्यक्रमात त्याने हे स्पष्ट केल्याने सोशल मीडियावर याची चर्चा सुरू झाली आहे, पण अभिनयातून असा ब्रेक घेणारा आमिर हा पहिला किंवा एकमेव कलाकार नाही. याआधीसुद्धा कित्येक कलाकारांनी ब्रेक घेऊन दणक्यात कमबॅकसुद्धा केलं आहे.
-
बॉलिवूडचा खलनायक संजय दत्त यानेसुद्धा ३ वर्षांचा ब्रेक घेतला होता. अर्थात त्यामागचं कारण वेगळ होतं. संजय दत्तला तुरुंगात जावं लागल्याने त्याला अभिनयातून ब्रेक घेणं भाग होतं. २०१४ ला शेवटी तो ‘पिके’ चित्रपटात झळकला. त्यानंतर थेट २०१७ मध्ये त्याने ‘भूमी’मधून कमबॅक केला.
-
अभिनेत्री राणी मुखर्जीनेदेखील तब्बल ४ वर्षांचा ब्रेक घेतला होता. २०१४ मध्ये ‘मर्दानी’सारखा हीट चित्रपट देऊनही राणीने थेट २०१८ च्या ‘हीचकी’ चित्रपटातून कमबॅक केला होता.
-
दमदार अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या तब्बूने रुपेरी पडद्यापासून काही काळ फारकत घेतली होती. ‘हैदर’ या चित्रपटातून तब्बूने पुनरागमन केलं होतं.
-
महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील बराच मोठा काळ ब्रेक घेतला होता. अखेर ‘केबीसी’सारख्या कार्यक्रमातून बिग बी पुन्हा उभे राहिले आणि आज ते कित्येकांना प्रेरणा देत आहेत.
-
जॉन अब्राहमनेही २ वर्षं अभिनयातून ब्रेक घेतला होता. त्या काळात निर्मितीक्षेत्राकडे लक्ष दिलं. ‘परमाणु’सारख्या जबरदस्त हीट चित्रपटातून त्याने कमबॅक केलं होतं.
-
अभिनेता सनी देओलनेही काही काळ चित्रपटांपासून फारकत घेतली होती. आपले चित्रपट लोकांना आवडत नाही हे समजताच त्याने स्वतः यातून ब्रेक घेतला होता.
-
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान तर गेली ४ वर्षं अभिनयापासून लांब आहे. यावर्षी त्याने एक दोन चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका केली. पण शाहरुख २०१८ साली ‘झीरो’मध्ये दिसला होता. आता थेट तो जानेवारी २०२३ मध्ये त्याच्या ‘पठाण’मधून जबरदस्त कमबॅक करणार आहे. (फोटो सौजन्य : इंडियन एक्सप्रेस)

“जेवढं मिळतंय त्यात आनंद मानायला शिका”; आयुष्यात सतत तक्रार करणाऱ्यांनो चिमुकलीचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी