-
हिना खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. सध्या हिना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
-
हिना बॉयफ्रेंड रॉकी जैसवालसह गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. २००९ साली ते पहिल्यांदा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर भेटले होते. परंतु, आता त्यांच्यात दुरावा आल्याचं चाहत्यांना वाटत होतं.
-
हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक स्टोरी शेअर केली होती. “विश्वासघात हे एकमेव सत्य आहे जे टिकून राहतं” असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं.
-
हिनाच्या या पोस्टमुळे रॉकी व तिच्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा रंगल्या. त्यामुळे तब्बल १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हिना व रॉकी ब्रेकअप करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं.
-
दुसऱ्या पोस्टमध्ये हिनाने लिहिले- ज्याने तुमची फसवणूक केली त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवल्याबद्दल स्वत:ला माफ करायला कधीही विसरू नका. कधीकधी चांगल्या हृदयाला वाईट गोष्टी दिसत नाहीत. हिनाची ही पोस्ट पाहून चाहते दुखी झाले आणि त्यांच्या काळजीत भर पडली.
-
दरम्यान, ७ डिसेंबरला, रॉकीने त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले. त्याने हिना खानबरोबरचा एक रोमँटिक फोटो पोस्ट केला आहे.
-
रॉकीने हिनाबरोबरचा मालदीव व्हेकेशनचा थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये रॉकी आणि हिना सूर्यास्ताचा आनंद लुटताना दिसत आहेत.
-
रॉकीने हा फोटो पोस्ट करताच या अफवांना पूर्णविराम मिळाला. रॉकी जैसवालने पोस्टच्या खाली कॅप्शन लिहिलं की, आम्ही एक आहोत.
-
हिना खानचं बॉयफ्रेंड रॉकी जैसवालसह ब्रेकअप झालेलं नाही. हिना आणि रॉकी अजूनही एकत्र आहेत. हिना खानने आपल्या नवीन प्रोजेक्टच्या प्रमोशनसाठी या पोस्ट केल्या होत्या.
-
हिनाची नवीन वेबसिरीज येत असून त्याचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. षडयंत्र असे या वेबसिरीजचे नाव आहे. यामध्ये अनेक गुपिते उघड होतील, फसवणुकीचे सत्य समोर येईल. हिना खान व्यतिरिक्त हा टीझर तिच्या बॉयफ्रेंडनेही शेअर केला आहे.
-
या वेबसिरीजमध्ये हिना खोटे आणि फसवणुकीच्या जाळ्यात अडकली आहे. अखेर हा कट कोणी रचला हे मालिकेतून समोर येणार आहे. हिनाची ही वेबसिरीज कधी प्रदर्शित होणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
-
या मालिकेत हिना खानसह कुणाल रॉय कपूर, चंदन रॉय सन्याल दिसणार आहेत. (Photos: Instagram)

Air India Plane Crash: “एअर इंडियाचे विमान पायलटने जाणूनबुजून क्रॅश केले असावे”, भारतातील आघाडीच्या विमान वाहतूक तज्ज्ञाचा दावा