-
अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. त्यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. अमिताभ बच्चन यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
-
दमदार अॅक्शन आणि कॉमेडीने बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या खात्यात अनेक हिट चित्रपटांचा समावेश आहे.
-
१०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या ‘खान’ स्टार्समध्ये फक्त सलमानचा समावेश आहे.
-
भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांनी आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत जवळपास १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांनी एकल नायक म्हणून १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
जितेंद्र यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांचे वाहवा मिळवली आहे. जितेंद्र यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
बॉलीवूडमध्ये नाव बदलून खलनायकाची भूमिका करणारे अभिनेता शक्ती कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये दिसले आहेत.
-
अभिनेता अनिल कपूरला पाहिलं की त्याचा एक गाजलेला डायलॉग ‘बोले तो एकदम झक्कास’ आठवल्याशिवाय राहत नाही. अनिल कपूरने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्तने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८१ मध्ये आलेल्या ‘रॉकी’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले.
-
सुपरस्टार विनोद खन्ना यांनी कधी काळी बाॅलिवूडवर राज्य केलंय. त्यांचं सिनेमातलं करियर यशस्वी झालं. या जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये आपली छाप सोडली.
-
खलनायक सहसा आवडीचा होत नाही. पण अमरीश पुरी मात्र याला अपवाद आहेत. खलनायक म्हणून अमरीश पुरी यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
-
ओम पुरीने अभिनयाच्या बळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. २०१७ मध्ये या जगाचा निरोप घेतला. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
-
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांनी एक कलाकार म्हणून बॉलिवूड जगतात आपली अमिट छाप सोडली.
-
प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी बॉलिवूडच्या जवळजवळ सर्वच दिग्गज निर्माता-दिग्दर्शकांसोबत कामं केलं. (फोटो सौजन्य:संग्रहित छायाचित्र)

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल