-
गेल्या काही वर्षात ओटीटी प्लॅटफॉर्म बराच लोकप्रिय झाला असून याच्या मोहापायी अनेक मोठ्या बॉलिवूड स्टार्सनीदेखील यावर हात आजमावला आहे.
-
ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे अनेक नव्या कलाकारांना आपली कला दाखवण्याची संधी मिळाली आहे.
-
आज आपण ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वांत महागड्या भारतीय कलाकारांविषयी जाणून घेऊया.
-
अनुराग कश्यपच्या सेक्रेड गेम्समध्ये सैफ अली खानने सरताज सिंगची भूमिका साकारली होती.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार या वेब सीरिजसाठी सैफने १५ कोटी रुपये आकारले होते.
-
‘द फॅमिली मॅन २’ या लोकप्रिय सीरिजसाठी अभिनेता मनोज बाजपेयीने १० कोटी रुपये घेतले होते.
-
डीएनएच्या रिपोर्टनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीने सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनसाठी १० कोटी रुपये आकारले होते.
-
मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे ही नेटफ्लिक्सचा लोकप्रिय चेहरा आहे. सेक्रेड गेम्समध्ये ती रॉ एजंटच्या भूमिकेत दिसली होती.
-
इंडिया टाइम्सच्या वृत्तानुसार, राधिकाने या पात्रासाठी ४ कोटी रुपये आकारले होते.
-
लोकप्रिय अभिनेता पंकज त्रिपाठी आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी ओळखले जातात.
-
पंकज त्रिपाठी यांनी मिर्झापूरच्या पहिल्या सीझनसाठी १० कोटी घेतले होते, तर सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनसाठी १२ कोटी रुपये घेतले होते.
-
अली फजल लोकप्रिय वेब सीरिज मिर्झापूरमध्ये गुड्डू भैयाच्या भूमिकेत दिसला होता.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या भूमिकेसाठी त्याने १२ लाख रुपये प्रति एपिसोड फी घेतली होती.
-
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथने ‘द फॅमिली मॅन 2’ मधील भूमिकेसाठी ४ कोटी रुपये फी घेतली.
-
हंसल मेहता यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिज ‘स्कॅम 1992’ मधील भूमिकेसाठी अभिनेता प्रतीक गांधीने एका एपिसोडसाठी प्रत्येकी ५ लाख आकारले होते.

महिलांनो ट्रेनने प्रवास करताना सावधान; समोर बसलेल्या मुलीसोबत व्यक्तीनं काय केलं पाहा, VIDEO पाहून धक्का बसेल