-
यंदाचे वर्ष अनेक कारणांमुळे चर्चेत राहिले. मात्र मराठी विश्वातील काही कलाकारांसाठी २०२२ ही वर्ष अतिशय आनंदाचे ठरले आहे.
-
या वर्षी अनेक मराठी कलाकार लग्नबंधनात अडकले तर काही जोडप्यांच्या घरी पाळणा हलला.
-
आज आपण मराठी मनोरंजन विश्वातील नव्याने आईबाबा झालेल्या कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
विजय चव्हाण यांचा मुलगा अभिनेता वरद चव्हाण नोव्हेंबर महिन्यात बाबा झाला. त्याला एक गोंडस मुलगी आहे.
-
‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता समीर खांडेकरने या वर्षात गुड न्यूज दिली आहे.
-
यावर्षी एप्रिल महिन्यात समीर गोंडस मुलीचा बाबा झाला.
-
लोकप्रिय अभिनेत्री आरती वडगबाळकरने या वर्षाच्या सुरुवातीलाच नव्या पाहुण्याचे स्वागत केले. आरतीला मुलगा आहे.
-
‘सुखं म्हणजे नक्की काय असतं!’ या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मिनाक्षी राठोडने काही महिन्यांपूर्वी एका गोड मुलीला जन्म दिला.
-
मिनाक्षी आणि अभिनेता कैलास वाघमारे यांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
-
मिनाक्षी आणि कैलासने त्यांच्या लेकीचे नाव ‘यारा’ असे ठेवले आहे. ‘यारा’ या नावाचा अर्थ ‘लहान फुलपाखरु’ किंवा ‘वॉटर लेडी’ असा होतो.
-
‘माझिया प्रियाला प्रित कळेना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मृणाल दुसानीसने मुलीला जन्म दिला आहे.
-
सर्व फोटो: instagram

Video : कंटेनरखाली येऊन एकाचा मृत्यू; तीन महिन्यांपूर्वी झाला होता विवाह, लिफ्ट शेवटची….