-
या नवीन वर्षात बॉलिवूडचे अनेक कलाकार आणि चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. येणाऱ्या नवीन वर्षात अनेक चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
-
गेले २०२२ वर्ष हे हिंदी सीने सृष्टीसाठी अतिशय कठीण आणि नुकसानदायक ठरले. त्यामुळेचे येणारे वर्ष बॉलिवूडसाठी चांगले जावे हीच सर्वांची इच्छा आहे.
-
गेल्या वर्षी दाक्षिणात्य चित्रपटांनी हिंदी चित्रपटांना धूळ चारली. केवळ दक्षिण भारतच नाही तर अनेक चित्रपटांनी संपूर्ण देशात कोट्यावधीची कमाई केली आहे.
-
म्हणूनच येणाऱ्या वर्षात हिंदीबरोबरच अनेक दाक्षिणात्य चित्रपटही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत.
-
२०२२ मध्ये, पुष्पा आणि आरआरआर सारख्या अनेक पॅन इंडिया चित्रपटांनी धूम केली. या वर्षीही अनेक भारतातील चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहेत. चला जाणून घेऊया या चित्रपटांची नावे.
-
प्रभास, सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘आदिपुरुष’ या वर्षी जानेवारीच्या अखेरीस रिलीज होणार आहे.
-
येणाऱ्या वर्षात ‘पीएस२’ चित्रपटसुद्धा संपूर्ण देशात रिलीज होणार आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
प्रभासचा ‘सालार’ चित्रपटही या वर्षी जून महिन्यात अनेक भाषांमध्ये रिलीज होत आहे.
-
पुष्पाच्या यशानंतर चाहते ‘पुष्पा २’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा २ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित होईल.
-
दीपिका पदुकोण आणि प्रभासचा आगामी चित्रपट ‘प्रोजेक्ट के’ देखील याच वर्षी रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनही आहेत.
-
सामंथा रुथचा ‘शाकुंतलम’ हा चित्रपटही याच वर्षी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.
-
(Photos: Social Media)

Daily Horoscope: महिन्याच्या शेवटच्या दिवशी स्वामी तुमच्या राशीला कसा देतील आशीर्वाद? मेष ते मीनचे राशिभविष्य वाचा