-
अभिनेत्री प्राजक्ता माळीने अल्पावधीतच उत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.
-
झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे तिचं नशिब बदललं.
-
पण अभिनयक्षेत्रामध्येच करिअर करायचं हे प्राजक्ताचं ठरलेलं नव्हतं.
-
हौस म्हणून तिने या क्षेत्रामध्ये काम करण्यास सुरुवात केली. इतकंच काय तर ती आता एक व्यावसायिकाही आहे.
-
नुकतंच ‘प्लॅनेट मराठी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने तिच्या खासगी आयुष्याबाबत भाष्य केलं.
-
एखाद्या अभिनेत्रीला मिळालेलं यश पाहून तुला काही वाटतं का? असा प्रश्न प्राजक्ताला विचारण्यात आला.
-
यावेळी ती म्हणाली, “मला काही वाटत नाही. माझ्या ते स्वभावातच नाही. महत्त्वाचं म्हणजे मी क्लासिकल डान्सर आहे. यामध्ये मी शिक्षणही घेतलं आहे”.
-
“त्यामुळे अभिनयक्षेत्रामध्ये काही झालं नाही तर माझ्याकडे पर्याय होता. अजूनही माझे पुण्यामध्ये डान्स क्लासेस आहेत. अभिनेत्री व्हायचं हे काही ठरलं नव्हतं”.
-
“अचनाक भयानक मी या क्षेत्रामध्ये आले. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेपर्यंत मला असं वाटत होतं की ही फक्त माझी हौस आहे. या मालिकेमुळेच माझं आयुष्य बदललं”.
-
पुढे प्राजक्ता म्हणाली, “या मालिकेनंतरच लोकप्रियता काय आहे हे कळालं. त्यानंतर लोकप्रियतेची चटक लागली. मुंबई आवडायला लागली. मुंबईमध्ये मी घर घेतलं”.
-
“त्यानंतर मी इथे राहिले. भरतनाट्यम म्हणजे मी वयाच्या सत्तरीपर्यंत नाचणार आहे. मला माहित आहे की मी तोपर्यंत जगणार आहे”. (सर्व फोटो – फेसबुक)

२१ वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिलेले बोल्ड सीन; मीनाक्षी शेषाद्री म्हणाली, “मला लाज…”