-
गेले काही महिने एमसी स्टॅन हा ‘बिग बॉस १६’मुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ‘बिग बॉस १६’चा विजेतेपद जिंकल्यावर त्याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
-
तो ज्या परिस्थितीतून इतका वर आला आहे त्यामुळे त्याचं अधिक कौतुक होत आहे. पण आता एका मुलाखतीत त्याने याच सर्व परिस्थितीचे केले आहे
-
एमसी स्टॅनने नुकतीच ‘द रणवीर शो’ या यूट्यूब चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने ‘बिग बॉस’बरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला.
-
लहानपणापासून त्याची झालेली जडण घडण, त्या परिस्थितीत जगताना त्याला मिळालेली शिकवण, आसपास घडणारी हिंसा, गुन्हेगारी विश्व याबद्दल स्टॅनने या मुलाखतीमध्ये मानमोकळेपणाने भाष्य केलं आहे.
-
हे सगळं सांगत असताना काही लोकांनी त्याला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता असंही तो म्हणाला.
-
स्टॅन म्हणाला, “आमच्या मित्राचा वाढदिवस होता. आम्ही त्याचा केक कापला आणि इतक्यात काही लोकांनी त्याला मारण्यास सुरुवात केली.”
-
“एकाने त्याच्या मानेवर तलवारीने वार केला तर दुसऱ्याने डोक्यात वार केला. हे सगळं आमच्या समोर सुरू होतं. माझ्या बाबतीतही दोन-तीन वेळा असं घडलं आहे.”
-
“पी-टाऊनमधील काही लोकांची मला जीवे मारण्याची इच्छा होती. त्यांनी तसा प्रयत्न केला होता. तीन-चार वेळा ते मला मारण्यासाठी धावले होते. पण देवाच्या कृपेने मी दरवेळी वाचलो.”
-
आता त्याची ही मुलाखत खूपच चर्चेत आली आहे. त्याच्या या बोलण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग