-    ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंकिता लोखंडे मागील काही दिवसात सतत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर असते. 
-    २०२१ मध्ये अंकिताने व्यावसायिक विकी जैनसह लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली. 
-    पण सुशांत- अंकिता जोडी आवडणाऱ्या चाहत्यांनी यानंतर प्रत्येक गोष्टीत अंकिताला ट्रोल करायला सुरु केलं आहे. 
-    अलीकडेच गुढीपाडव्यासाठी अंकिताने पतीसह पारंपरिक पद्धतीने पूजा करतानाच रील शेअर केला होता. 
-    अंकिताने खास हिरव्या रंगाची साडी नेसली होती. तर विकीने डिझायनर कुर्ता परिधान केला होता. 
-    “कलश कुठे आहे?” असं एकाने कमेंट करत विचारलं आहे. तर दुसऱ्याने “गुढीवर कलश नाहीये” अशी कमेंट केली आहे 
-    “कलश तर नाहीच आणि घरात कोणी गुढी उभं करतं का? काहीही पद्धती यांच्या”, असंही एकाने म्हटलं आहे. 
-    Dear Ankita मराठी असल्याची थोडी लाज बाळग..गुढी उभरता येत नसेल तर दिखाव्या साठी उभारू नकोस..आई वडिलांनी अशीच गुढी उभारली होती का तुझ्या लहानपणी ? अशा शब्दात नेटकऱ्यांनी अंकिताला सुनावले आहे. 
-    अंकिताच्या गुढीपाडव्याच्या रीलवर काही चाहत्यांनी मात्र ट्रॉलर्सना सुनावले सुद्धा आहे. तिला आनंदाने जगू द्या असेही काहींनी म्हंटले आहे. 
 
  Ajit Pawar : अजित पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादीच्या ७ आमदारांनी सोडली साथ; सत्ताधारी पक्षात झाले सामील 
  
 
  
  
  
   
   
   
   
   
   
  