-
दिवंगत बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती ९० च्या दशकातील टॉपची अभिनेत्री होती.
-
दिव्याने फार कमी वेळात प्रसिद्धीच्या त्या शिखरांना स्पर्श केला, ज्याची चित्रपटसृष्टीतील प्रत्येक अभिनेत्रीला आकांक्षा असते.
-
अवघ्या तीन वर्षांत तिने २० चित्रपटांमध्ये काम केले आणि अनेक सुपरहिट चित्रपट देऊन बॉलिवूडची नंबर वन हिरोईन बनली.
-
५ अप्रैल १९९३ रोजी वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. पाचव्या मजल्यावरुन पडून दिव्याचा मृत्यू झाला होता.
-
दिव्याचा मृत्यू बाबातचे गूढ अद्याप कायम आहे.
-
दिव्याच्या अचानक जाण्यामुळे बॉलिवूडला मोठा धक्का बसला होता.
-
दिव्याच्या जाण्यामुळे अनेक चित्रपट अर्धवट राहिले होते.
-
कालांतराने त्या जागी दुसऱ्या अभिनेत्रींना घेऊन ते चित्रपट पूर्ण करण्यात आले.
-
‘लाडला’ या सुपरहिट चित्रपटातही दिव्या होती, पण नंतर श्रीदेवीने त्यात काम केले.
-
मोहरामध्ये रवीना टंडनने तिची जागा घेतली.
-
दिलवाले चित्रपटात दिव्याच्या जागी रविनाने काम केले.
-
दिव्याच्या मृत्यूनंतर तब्बूला ‘विजयपथ’मध्ये कास्ट करण्यात आले होते.
-
तर आंदोलन चित्रपटात ममता कुलकर्णीला मुख्य अभिनेत्री म्हणून घेण्यात आले.
-
हलचल चित्रपटात दिव्याच्या जागी काजोलला कास्ट करण्यात आले.
-
दिव्याच्या मृत्यूनंतर ‘कर्तव्य’ चित्रपटात जूही चावलाला घेण्यात आलं

भारतातील IT क्षेत्र चिंतेत; अमेरिकेत आउटसोर्सिंगविरोधात विधेयक सादर, लाखो नोकऱ्या जाण्याची भीती