-
बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या बहुप्रतिक्षित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटासाठी चर्चेत आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम या चित्रपटातील कलाकारांच्या स्टायलिश लूकमुळे अधिक चर्चेत राहीला.
-
अभिनेता सलमान खानने काळ्या रंगाचा शर्ट परिधान करून स्टायलिश एन्ट्री केली.
-
या कार्यक्रमासाठी पूजा हेगडेने पिवळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला होता.
-
‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून शहनाज गिलचे बॉलिवूड डेब्यू झाले.
-
या चित्रपटाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी भूमिका चावला आणि सलमान खान यांचे रियुनियन पाहायला मिळाले.
-
जगपती बाबू कॅज्युअल पोशाखात देखणा दिसत होता.
-
अभिनेत्री पलक तिवारी स्टायलिश को-ऑर्डर सेटमध्ये सुंदर दिसत होती.
-
विनाली भटनागरने काळ्या रंगाचा कटआउट ड्रेस परिधान केला होता.
-
ट्रेलर लॉन्चमध्ये राघव जुयालनेही स्टायलिश एन्ट्री केली.
-
‘किसी का भाई किसी की जान’च्या ट्रेलर लॉन्चमध्ये विजेंदर सिंग उपस्थित होता.
-
सिद्धार्थ निगमने या ट्रेलर लॉन्चसाठी ऑल ब्लॅक लुक केला होता.
-
या कार्यक्रमाला जस्सी गिलही उपस्थित होता.
-
‘किसी का भाई किसी की जान’ या ईदला म्हणजेच २१ एप्रिलला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे. (फोटो: वरिंदर चावला)

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला