-  
  रितेश देशमुख हा मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. हिंदी बरोबरच रितेशने मराठी चित्रपटांत काम करुन अभिनयाचा ठसा उमटवला.
 -  
  रितेश सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
 -  
  रितेशने नुकतंच फोटोशूट केलं आहे. त्याने इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
 -  
  या फोटोमध्ये रितेशने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
 -  
  रितेशने फोटोशूटसाठी खास लूक केल्याचं फोटोत पाहायला मिळत आहे.
 -  
  त्याने फोटोसाठी विविध पोझही दिल्या आहेत.
 -  
  रितेशचे हे फोटोशूट पाहून नेटकऱ्यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आठवण झाली आहे.
 -  
  रितेशच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत.
 -  
  मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने रितेशच्या फोटोंवर “एकदम चिकने दिसताय सर. साहेबांची आठवण आली,” अशी कमेंट केली आहे.
 -  
  “रितेश सर तुम्हाला या लूकमध्ये पाहून साहेबांची आठवण झाली” अशी कमेंट केली आहे.
 -  
  “सेम विलासराव देशमुख दिसताय…” असं एकाने म्हटलं आहे.
 -  
  “मिशीमुळे हुबेहूब विलासराव देशमुख साहेब यांच्या सारखे दिसत आहात..! साहेबांची आठवण आली,” असंही म्हटलं आहे.
 -  
  “मा.मुख्यमंत्री श्री विलासराव देशमुख साहेब यांचा चेहरा,” अशी कमेंटही केली आहे.
 -  
  रितेश देशमुखचं हे फोटोशूट चर्चेत असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो : रितेश देशमुख/ इन्स्टाग्राम)
 
  VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल