-
आंतरराष्ट्रीय सुपरस्टार, अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिच्या ‘मेट गाला २०२३’च्या लूकसाठी विशेष चर्चेत आहे. यावेळी तिने परिधान केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या हिऱ्याच्या नेकलेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
-
दरम्यान प्रियांकाने आपल्या दिवंगत वडील अशोक चोप्रा यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. प्रियांकाने यावेळी तिच्या किशोरवयातील एक प्रसंग सांगितला आहे.
-
प्रियांकाने हा धक्कादायक खुलासा करत म्हटलंय की ती १६ वर्षांची असताना तिच्या वडिलांनी खिडक्यांना लोखंडाच्या जाळ्या बसवून घेतल्या. इतकेच नाही तर तिला जीन्स घालण्यापासूनही त्यांनी मनाई केली होती.
-
प्रियांका तिच्या लहानपणीची एका घटनेचा उल्लेख करत म्हणाली की, जेव्हा ती अमेरिकेहून अभ्यास पूर्ण करून भारतात परतली, तेव्हा एका मुलाने तिच्या बाल्कनीत उडी मारली होती. या घटनेनंतर तिचे वडील खूपच घाबरले.
-
प्रियांका म्हणाली, तिचे बाबा तिच्यासाठी खूपच संवेदनशील होते. केसांची वेणी घालणाऱ्या आणि सतत कुल बनण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या एका साधारण मुलीला त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षी अमेरिकेत शिकायला पाठवले.
-
अमेरिकेतील खानपान आणि हार्मोनल बदलांमुळे प्रियांका आपल्या वयाच्या मानाने खूपच मोठी दिसायची. १६ वर्षांच्या मुलींच्या तुलनेत प्रियांका खूपच प्रगल्भ होती.
-
अमेरिकेतील खानपान आणि हार्मोनल बदलांमुळे प्रियांका आपल्या वयाच्या मानाने खूपच मोठी दिसायची. १६ वर्षांच्या मुलींच्या तुलनेत प्रियांका खूपच प्रगल्भ होती.
-
तिने सांगितले की ती जेव्हा ती अमेरिकेतून पुन्हा भारतात परतली तेव्हा ती त्या छोट्या शहरातही अमेरिकेत असल्याप्रमाणेच राहायची.
-
प्रियांकाचा पाठलाग करत मुलं तिच्या घरापर्यंत पोहचयचे. मात्र प्रियांकाला असंच वाटायचं की कोणतीही तिला काहीही करू शकत नाही.
-
पण एके दिवशी एक मुलगा चक्क तिच्या बाल्कनीत पोहोचला. प्रियांका त्याला बघून किंचाळली आणि आपल्या बाबांकडे गेली. तिचे बाबा येताच तो मुलगा तिथून पळून गेला.
-
पुढल्या दिवशी प्रियांकाच्या बाबांनी तिला अनेक गोष्टींसाठी बंधने घातली. त्यांनी लगेचच घरच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या बसवून घेतल्या. त्याचबरोबर त्यांनी तिच्या सर्व जीन्स जप्त केल्या आणि तिला केवळ भारतीय कपडे परिधान करण्याची सक्ती केली.
-
इतकेच नाही तर त्यांनी तिला घराबाहेर एकट्याने फिरण्यासही बंदी घातली. त्यांनी प्रियांकासाठी एक ड्रायव्हर ठेवला होता, जो प्रियांकाला बाहेर घेऊन जात असे. त्या घटनेमुळे प्रियांकाचे बाबा खूपच घाबरले होते.
-
ती म्हणाली की, त्यावेळेस मला त्याचे गांभीर्य समजले नव्हते. अमेरिकेतून आल्यानंतर जवळपास दोन वर्षे ती खूपच गर्विष्ठ होती. मात्र आता तिला त्यांची काळजी समजत असल्याचेही ती म्हणाली.
-
नुकतीच प्रियांकाची ‘सिटाडेल’ ही वेब सिरीज रिलीज झाली आहे. या मालिकेतील प्रियांकाच्या कामाचे खूप कौतुक होत आहे.
-
यामध्ये ती अॅक्शन सीन करताना दिसल आहे. याचे प्रेक्षक खूप कौतुक करत आहेत. ही वेब सिरीज अॅमझोन प्राइमवर पाहता येईल.
-
सर्व फोटो : @priyankachopra/Instagram

बापरे! तरुण ११० च्या स्पीडला बुलेट पळवत होता; अचानक ब्रेक मारला अन्… क्षणार्धात घडला भयंकर अपघात, लाईव्ह VIDEO व्हायरल