-
बॉलिवूड हे भारतातील मनोरंजनाचं केंद्र मानले जाते. मात्र आता ओटीटीने बॉलिवूड सिनेमांचं मार्केट खाऊन टाकलं आहे. इतकंच नाही तर बॉलिवूड कलाकारांपेक्षा आजकाल ओटीटी कलाकार मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचत आहेत.
-
प्रेक्षकांच्या प्रेमाबरोबरच या कलाकारांना मोठं मानधन मिळतं. आज आपण ओटीटी विश्वातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांबद्दल जाणून घेऊया.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंचायत सीजन २च्या प्रत्येक एपिसोडसाठी अभिनेता जितेंद्र कुमारने ५० हजार रुपये घेतले आहेत.
-
अॅमेझॉन प्राइमच्या या सीरिजमध्ये आठ एपिसोड होते. जितेंद्रने या आठ एपिसोडसाठी चार लाख रुपयांचे एकत्रित मानधन घेतले आहे.
-
अभिनेता बॉबी देओलने बॉलिवूडमध्ये अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. मात्र, त्याचबरोबर त्याने ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली जादू दाखवली आहे.
-
‘आश्रम’ या वेबसीरिजच्या तीनही पर्वांमध्ये तो प्रमुख भूमिकेत होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉबी देओलने या सीरिजच्या तिसऱ्या पर्वासाठी तिने जवळपास १ ते ४ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते पंकज त्रिपाठी आपल्या अभिनय कौशल्य आणि साधेपणासाठी विशेष लोकप्रिय आहेत. त्यांनी ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजमधील गुरुजीच्या भूमिकेसाठी जवळपास १२ कोटी रुपये मानधन घेतले होते.
-
दुसरीकडे, अॅमेझॉन प्राइमच्या ‘मिर्जापुर’ या सीरिजमधील कालीन भैय्या या पात्रासाठी त्यांनी जवळपास १० कोटी रुपये फी घेतली.
-
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आपल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ या सीरिजमधील पात्रावर प्रेक्षकांनी खूप प्रेम केले.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवाजुद्दीन सिद्दीकीने या सीरिजसाठी जवळपास २ ते १० कोटी रुपये मानधन घेतले होते.
-
अभिनेता अली फजलने ‘मिर्जापुर’ ही सीरिज गाजवली. त्याच्या डायलॉग्सने प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीने या सीरिजच्या एका एपिसोडसाठी जवळपास १२ लाख रुपये फी घेतली होती. (Photos: Official Instagram Accounts)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा