-
प्रभास आणि क्रिती सेनॉनची प्रमुख भूमिका असलेला आगामी चित्रपट आदिपुरुषचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे.
-
आदिपुरुषच्या ट्रेलरमध्ये रामाच्या वनवासापासून ते लंका दहनपर्यंत आणि लंकेवर वानरसेनेचा हल्ला हे प्रसंग दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात मोठ्या स्टारकास्टने काम केले आहे.
-
मल्टी स्टार्सचा समावेश असलेला हा मेगा बजेट चित्रपट १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ या चित्रपटासाठी निर्मात्यांनी ५५० कोटी रुपये खर्च आहेत.
-
या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी प्रभासपासून सैफ अली खानपर्यंत अनेक कलाकारांनी फी म्हणून मोठी रक्कम घेतली आहे. या चित्रपटातील ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी या स्टार्सना किती फी दिली ते जाणून घेऊया.
-
‘आदिपुरुष’मध्ये रामची भूमिका साकारण्यासाठी अभिनेता प्रभासला मोठी रक्कम मिळाली आहे. या चित्रपटासाठी प्रभासने सर्वाधिक १५० कोटी रुपये मानधन घेतल्याची चर्चा आहे.
-
सैफने केवळ कॉमेडीच नाही तर खलनायकाची भूमिका साकारूनही चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. लवकरच तो पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.
-
प्रभास स्टारर ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकारत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्याने या चित्रपटासाठी जवळपास १२ कोटी रुपये घेतले आहेत.
-
प्रभाससोबत या चित्रपटात क्रिती सेनॉन दिसणार आहे. ती पहिल्यांदाच प्रभाससोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
-
या चित्रपटात क्रितीने सीतेची भूमिका साकारली आहे. सीतेची भूमिका साकारण्यासाठी क्रितीने जवळपास ३ कोटी रुपये घेतले आहेत.
-
‘प्यार का पंचनामा’ फेम सनी सिंगने या चित्रपटात लक्ष्मणची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने सुमारे दीड कोटी रुपये घेतले आहेत.
-
या चित्रपटात सोनल चौहानही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिने ५० लाख रुपये घेतले आहेत.
-
मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे याने या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याला किती मानधन देण्यात आली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र ट्रेलरमध्ये त्याची भूमिका खूपच दमदार दिसत आहे. (Photos: Instagram)

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा