-
परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत.
-
परिणीती आणि राघव उद्या म्हणजे १३ मे रोजी दिल्लीत साखरपुडा करणार आहेत.
-
गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरु होत्या.
-
परिणीती आणि राघव दोघेही आपापल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत आणि आपापल्या क्षेत्रात भरपूर पैसा कमावत आहेत.
-
मात्र, उत्पन्नाच्या बाबतीत परिणीती राघव यांच्या कितीतरी पटीने पुढे आहे.
-
राघव चढ्ढा हे राजकारणी असण्यासोबतच चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत.
-
फायनान्शिअल एक्सप्रेसच्या मते, राघव चड्ढा अतिशय साधे जीवन जगतात आणि त्यांची एकूण संपत्ती अंदाजे ५० लाख रुपये आहे.
-
सोशल मीडियानुसार, परिणीती चोप्राची एकूण संपत्ती ६० कोटी रुपये आहे.
-
ती प्रामुख्याने चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून कमाई करते.
-
मुंबईच्या जवळ तिची लक्जरी सी फेसिंग अपार्टमेंट देखील आहे.
-
याशिवाय परिणीती हिच्याकडे ऑडी सारख्या महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन आहे.
-
परिणीती आणि राघव या वर्षाअखेर पर्यंत लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.

“मी प्रत्येक वेळी सावध…”, करिश्मा कपूरने सांगितला गोविंदाबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…