-
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. तिने जानेवारी २०२१ मध्ये मेहुल पैशी लग्नगाठ बांधली.
-
२०२१ मध्ये लग्नगाठ बांधल्यावर एक वर्षाच्या आत अभिज्ञाच्या नवऱ्याला कर्करोगाचे निदान झाले होते.
-
रुग्णालयात व्यवस्थित उपचार घेतल्यानंतर मेहुल कर्करोगमुक्त झाला. याबाबत अभिज्ञाने सोशल मीडियावर पोस्ट करुन माहिती दिली होती.
-
आज मेहुलच्या वाढदिवसानिमित्त अभिज्ञाने खास पोस्ट शेअर आपल्या नवऱ्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
-
वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करताना अभिज्ञाने त्याच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
-
“आयुष्यातील अनेक उतार-चढाव पार करुन आता तू पुन्हा एकदा उंच झेप घेण्यासाठी सज्ज आहेस आणि मी तुझ्या कायम पाठिशी आहे” असे अभिज्ञाने नवऱ्यासाठी लिहिले आहे.
-
इन्स्टाग्रामवर नवऱ्याबरोबर ती असंख्य फोटो शेअर करत असते.
-
अभिज्ञाने मेहुलच्या वाढदिवसानिमित्ता केलेल्या पोस्टवर त्यांच्या असंख्य चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
-
मराठी कलाविश्वातील अभिज्ञाच्या अनेक मित्रमंडळींनी वाढदिवसानिमित्त मेहुलवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावलं; कृषी काढून ‘क्रीडा’ दिलं!