-
सलमान खानच्या ‘लकी – नो टाइम फॉर लव्ह’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री स्नेहा उल्लाल सध्या लाईमलाइटपासून बरीच दूर आहे.
-
१८ व्या वर्षी स्नेहाने जेव्हा बॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं तेव्हा तिला दुसरी ऐश्वर्या राय अशीच ओळख मिळाली होती. तिचे लूक्स, खासकरून तिचे डोळे हे अगदी ऐश्वर्यासारखे असल्याने बऱ्याच लोकांचा गोंधळ उडत असे.
-
स्नेहाने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. तसेच तिने साऊथच्या चित्रपटांमध्येही नशीब आजमावले, पण तिला तिथे यश मिळाले नाही. तिचे बहुतेक सगळेच चित्रपट फ्लॉप ठरले.
-
२०१५ नंतर अचानक स्नेहाने या रुपेरी पडद्यापासून फारकत घेतली.
-
स्नेहाला ऑक्टोइम्यून डिसऑर्डर नावाचा आजार होता, त्यामुळे ती चार वर्ष स्वतःच्या पायावरही उभी राहू शकली नव्हती, म्हणूनच तिने चित्रपटातून ब्रेक घ्यायचं ठरवलं.
-
आता ती पूर्णपणे बरी झाली आहे. २०२२ मध्ये आलेल्या ‘लव्ह यू डेमोक्रेसी’ या चित्रपटाद्वारे तिने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले.
-
हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.
-
स्नेहा सध्या या चंदेरी दुनियेपासून दूर आहे, इंस्टाग्रामवर ती सक्रिय असते. इंस्टाग्रामवर तिचे ८३३ हजार फॉलोअर्स आहेत. ती बहुतेक रोजच काहीना काही अपडेट देत असते.
-
फोटो सौजन्य : स्नेहा उल्लाल / इंस्टाग्राम

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताचा पाकिस्तानवर एअर स्ट्राईक, पाक दहशतवादी तळांवर हल्ले