-
क्वचितच असा कोणी असेल जो साऊथ सुपरस्टार प्रभासला ओळखत नसेल. प्रभासने तेलुगू चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. आज संपूर्ण देशात तो त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो.
-
दक्षिण बरतात तर प्रभासचे चाहते त्याला देवांप्रमाणे मानतात. त्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच जात आहे. आपल्या अभिनयाने प्रभासने लोकांची मनं जिंकली आहेत.
-
राजामौली यांच्या ‘बाहुबली’ याचित्रपटातून प्रभासचे नशीब चमकले. याच चित्रपटाने प्रभासला संपूर्ण जगात प्रसिद्धी मिळवून दिली.
-
याचाच परिणाम असा की आज प्रभास मनोरंजन विश्वातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे.
-
आजच्या घडीला बॉलिवूडमधील दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेत्री प्रभासबरोबर काम करण्यासाठी उत्सुक आहेत.
-
सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटासाठी प्रभासने मोठी रक्कम घेतली आहे.
-
अनेक हिट चित्रपट दिल्यानंतर प्रभासचे बाजारमूल्य खूपच वाढले आहे. याच निमित्ताने आज आपण प्रभासच्या संपत्तीवर एक नजर टाकूया.
-
प्रभासला महागड्या वस्तूंची खूप आवड आहे. त्याच्याकडे महागड्या कार आणि घराचे चांगले कलेक्शन आहे आहे.
-
प्रभास हैदराबादच्या एका पॉश भागात राहतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या घराची किंमत जवळपास 65 कोटी आहे. तसेच प्रभासकडे फॅन्सी कारचा देखील संग्रह आहे.
-
प्रभासकडे मध्ये रेंज रोव्हर, ऑडी, बीएमडब्ल्यू 7 सीरीज यासह एकापेक्षा एक महागड्या कार आहेत ज्यांची किंमत सुमारे 2 कोटी आहे.
-
इतकेच नाही तर, त्याच्याकडे असलेल्या मर्सिडीज बेंझ एस क्लासची किंमत 2 कोटी, एक Jaguar XJL ची किंमत 1 कोटी आणि Rolls Royce Phantom ची किंमत 8 कोटी आहे.
-
प्रभासच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच प्रशांत नील दिग्दर्शित सालार या थ्रिलर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. (फोटो : Instagram)

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग