-
चित्रपटाच्या यश-अपयशावर त्या चित्रपटात काम करणाऱ्या मुख्य कलाकारांच्या मानधनाचा आकडा ठरत असतो. मात्र गेल्या काही काळापासून संपूर्ण मनोरंजन विश्वच कठीण काळातून जात आहे.
-
करोना महामारीनंतर मोठमोठ्या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले आहेत. त्यामुळेच अनेकांची चिंता वाढली आहे. अशातच अनेक कलाकार आपले मानधन कमी करत असल्याचे समजले आहे.
-
काही प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांनी चित्रपटांसाठीचे मानधन कमी केले आहे. यामध्ये अक्षय कुमार आणि शाहिद कपूर यांच्या नावांचाही समावेश आहे.
-
शाहिद आणि अक्षय कुमार यांच्याप्रमाणे कोणकोणत्या कलाकारांनी आपले मानधन कमी केले आहे, ते जाणून घेऊया.
-
गेल्या वर्षी शाहिद कपूरचा ‘जर्सी’ चित्रपट फ्लॉप ठरला होता. OTT वरील ‘ब्लडी डॅडी’ देखील अपेक्षेनुसार कामगिरी करू शकला नाही. या चित्रपटासाठी शाहिदला ४० कोटी फी मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र, त्याने पुढच्या चित्रपटासाठी त्याचे मानधन २५ कोटी इतकी केली आहे.
-
83, जयेश भाई जोरदार आणि सर्कस सारख्या चित्रपटांच्या अपयशानंतर रणवीर सिंगची क्रेझ कमी झाली असल्याचे दिसत आहे. त्याचाच परिणाम असा की रणवीरने त्याचे मानधन 40 कोटींवरून 30 कोटी प्रति चित्रपट केल्याची माहिती मिळाली आहे.
-
वरुण धवनला अनेक दिवसांपासून हिट चित्रपट देता आलेला नाही. यानंतर त्याच्या चित्रपटांच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिणामी, वरुणने फीमध्ये कपात केल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्वी प्रती चित्रपट 30 कोटी रुपये मानधन घेणारा वरुण आता 20 कोटी रुपये घेत आहे.
-
२०१९ मध्ये रिलीज झालेला ‘हाऊसफुल 4 ‘ हा क्रिती सॅननचा शेवटचा हिट चित्रपट होता. त्यानंतर पानिपत, बच्चन पांडे, भेडिया आणि शहजादा हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कामगिरी करू शकले नाहीत.
-
सध्या क्रितीच्या ‘आदिपुरुष’बद्दलही वाद सुरू आहेत. याचाच परिणाम असा की चित्रपटांसाठी 8 कोटी रुपये मानधन घेणाऱ्या क्रितीने आता तिची फी कमी करून 5 कोटी रुपये केली असल्याची बातमी आहे.
-
जान्हवी कपूरच्या आतापर्यंत प्रदर्शित झालेल्या सहा चित्रपटांपैकी घोस्ट स्टोरीज, गुंजन सक्सेना, गुडलक जेरी हे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले आहेत. तिच्या धडक, रुही, मिली या चित्रपटांना थिएटरमध्ये यश मिळाले नाही. परिणामी तिने आपली फी 6 कोटींवरून 3 कोटी रुपये केली आहे.
-
येथे देण्यात आलेली माहिती मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे.
-
सर्व फोटो : Instagram

“मी मुस्लीम आहे त्यामुळे…”, ‘गणपती बाप्पा मोरया’ न बोलल्याबद्दल अली गोनीची प्रतिक्रिया; म्हणाला, “कुराणमध्ये…”