-
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
-
‘रॉकी और रानी…’ आणि २००१ मध्ये रिलीज झालेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या दोन्ही चित्रपटातील सीन्समध्ये बरेच साम्य आहे.
-
दोन्ही चित्रपटातील सारख्या सीन्सचे बरेच फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
‘रॉकी और रानी…’ च्या टीझरमधील भव्य सेट, शिफॉन साड्या, बर्फाळ प्रदेशातील रोमॅंटिक गाणे हे सगळं पाहून प्रेक्षकांना २००१ चा सुपरहिट चित्रपट ‘कभी खुशी कभी गम’ची आठवण झाली आहे.
-
दोन्ही चित्रपटातील अनेक सीन्स अगदी सेम टू सेम असल्याचे या व्हायरल फोटोंमधून स्पष्ट होत आहेत.
-
‘रॉकी और रानी…’ आणि ‘कभी खुशी कभी गम’मधील साम्य पाहून नेटकऱ्यांनी दिग्दर्शक करण जोहरला ट्रोल केले आहे.
-
“करणने त्याच्याच सुपरहिट चित्रपटातील काही सीन्स फक्त कॉपी पेस्ट करण्याचे काम केले आहे.” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
-
एका युजरने “आलिया आणि करण नवीन काहीच करू शकत नाहीत”, असे म्हणत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटावर टीका केली आहे.
-
दरम्यान, आलिया भट्ट आणि रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असलेला ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

India On Trump : ‘अमेरिकेचा हा निर्णय अत्यंत…’, ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त कर लादल्यानंतर भारताचं सडेतोड उत्तर