-
फॅशन आयकॉन म्हणून प्रसिद्ध असलेली बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर दीर्घकाळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे.
-
2019 साली प्रदर्शित झालेला ‘जोया फॅक्टर’ या चित्रपटात सोनमने अखेरचे काम केले होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही.
-
यानंतर सोनम मोठ्या ब्रेकवर गेली. मात्र आता रुपेरी पडद्यावर दमदार पुनरागमन करण्यासाठी सोनम कपूर सज्ज झाली आहे.
-
सोनम लवकरच ‘ब्लाइंड’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कालच या चित्रपटाचा टीजर रिलीज झाला. यानंतर हा चित्रपट चर्चेत आहे.
-
या चित्रपटात सोनल एक अंध अधिकाऱ्याची भुमिका बजावत असून अभिनेता पूरब कोहली एका सिरियल किलरच्या भूमिकेत दिसेल.
-
टीजरमध्ये आपण पाहू शकतो की सोनम अंध असूनही या सिरियल किलरचा शोध घेत आहे.
-
टीजरमध्ये सिरियल किलरचीही एक भयानक झलक पाहायला मिळाली आहे.
-
हा चित्रपट 2011 साली प्रदर्शित झालेल्या कोरियन चित्रपटाचा रिमेक आहे. यामध्ये सोनम आणि पूरब यांच्याबरोबरच विनय पाठक आणि लिलेट दुबे आहे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
स्कॉटलंड येथे या चित्रपटाचा सर्वाधिक भाग शूट करण्यात आला आहे. 7 जुलैला हा चित्रपट जिओ सिनेमा वर प्रदर्शित होणार असून हा सोनमचा पहिला ओटीटी चित्रपट आहे.
-
सोनमने आपला मुलगा वायु याच्या जन्माच्या काही दिवस आधीच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले होते. चित्रीकरणाचा सोनम आणि तिच्या बळावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे तिने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले.
-
सोनमने सांगितले की आता ती पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात करणार आहे.
-
(Photos: Instagram)

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं ‘सभागृहात रमी’ प्रकरण फक्त खातेबदलावर निभावलं; कृषी काढून ‘क्रीडा’ दिलं!