-
अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मात्र, हा चित्रपट त्याच्या कथेसाठी कमी आणि त्यातील पाकिस्तानी गाणे ‘पसुरी’च्या रिमेकमुळे जास्त चर्चेत आहे.
-
हे मूळ गाणे पाकिस्तानी गायक अली सेठी याने गायले आहे. या गाण्याचा भारतीय रिमेक ऐकून अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या गाण्याला ट्रोलही केले आहे.
-
मात्र, बॉलिवूडने पाकिस्तानी गाण्यांचा रिमेक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक पाकिस्तानी गाण्यांचे रिमेक बनवण्यात आले आहे. ही गाणी कोणती आहेत ते जाणून घेऊया.
-
बॉलिवूड गायिका कनिका कपूरने गायलेले ‘बुहे बरियान’ हे गाणे 90 च्या दशकात प्रसिद्ध पाकिस्तानी गायिका हादिया कियानीने गायले होते.
-
‘स्टुडंट ऑफ द इयर’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘डिस्को दीवाने’ हे पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया हसनच्या या गाण्याचे बॉलिवूड रिमेक व्हर्जन आहे.
-
सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘लव आज कल’ चित्रपटात वापरण्यात आलेल्या ‘कदी ते हस’ या गाण्याचे मूळ व्हर्जन पाकिस्तानी गायक शौकत अलीने गायले होते.
-
पाकिस्तानी कव्वाली गायक नुसरत फतेह अली खान यांच्या ‘मेरे रश्के कमर’ या गाण्याचे रिमेक व्हर्जन अजय देवगणच्या ‘बादशाहो’ चित्रपटात वापरण्यात आले आहे.
-
‘फन्ने खान’ चित्रपटातील ‘हलका हलका सुरूर’ या गाण्याचे मूळ व्हर्जनही नुसरत फतेह अली खान यांनी गायले आहे.
-
नुसरत फतेह अली खान यांच्या अनेक गाण्यांचे रीमेक बॉलिवूडने केले आहे. त्यात ‘मरजावां’ चित्रपटातील ‘किन्ना सोना’ या गाण्याचाही समावेश आहे.

पितृपक्षात ‘या’ राशींना मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद! अफाट पैसा, धनसंपत्ती अन् मोठं यश, तर ‘या’ राशींच्या नशिबी संकट…