-
अभिनेत्री तितीक्षा तावडे सध्या झी मराठीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे.
-
सोशल मीडियावर तितीक्षा ‘दृश्यम २’ फेम अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा रंगली आहे.
-
यामागचं कारण म्हणजे तितीक्षाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो.
-
तितीक्षाने अभिनेता सिद्धार्थ बोडकेबरोबरचा रोमँटिक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
सिद्धार्थने २०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘टाईम बरं वाईट’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
-
त्यानंतर सिद्धार्थ ‘भय’ आणि ‘नेबर्स’ या चित्रपटांमध्ये दिसला.
-
झी युवा वाहिनीवरील ‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेतून सिद्धार्थला प्रसिद्धी मिळाली.
-
सिद्धार्थने ‘नकुशी तरी हवीहवीशी’, ‘असे हे कन्यादान’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
‘शाबाश मिथू’ या चित्रपटातून तितीक्षाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
तितीक्षाने ‘सरस्वती’, ‘कन्यादान’, ‘तू अशी जवळी राहा’ आणि ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
तितीक्षा आणि सिद्धार्थच्या फोटोंवर ‘तुम्ही एकमेकांना डेट करत आहात का?’ अशा कमेंट्स आहेत.
-
खरंच हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर आहे.
-
तितीक्षा आणि सिद्धार्थने त्यांचा रिलेशनशिपबद्दलची कोणती ही माहिती अद्याप दिली नाही आहे.
-
हे दोघे एकमेकांबरोबरचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे आणि सिद्धार्थ बोडके / इन्स्टाग्राम)

Randhir Jaiswal On Trump : “कोणत्याही तिसऱ्या देशाच्या…”, ट्रम्प यांच्या ‘त्या’ विधानाला भारताचं सडेतोड उत्तर; जयस्वाल म्हणाले, ‘भारत-रशिया…’