-
महानायक अमिताभ बच्चन यांचे पुत्र अभिषेक बच्चन याचा समावेश बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये होतो.
-
२००० साली ‘रिफ्यूज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेकने अनेक चित्रपटात उत्तम कामगिरी केली आहे.
-
‘गुरु’, ‘युवा’, ‘कभी अलविदा ना कहना’ आणि ‘मनमर्जियां’ या चित्रपटांमध्ये अभिषेकचं कौतुक झालं असलं तरीही त्याला आपल्या करिअरमध्ये यश संपादन करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले.
-
अभिषेक बच्चन हा एक चांगला अभिनेता असला तरीही त्याची तुलना त्याचे वडील दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासह केली जाते. यामुळेच त्याच्या कामाचे म्हणावे तसे कौतुक झालेले नाही.
-
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन हे बॉलिवूडमधील खूप मोठं नाव आहे. पण त्यांच्याइतकं नाव किंवा हिट चित्रपट त्यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चनला देता आले नाहीत.
-
अभिनय तसेच कारकिर्दीतील चित्रपटांवरून अभिषेक बच्चन आणि त्याचे वडील अमिताभ बच्चन यांची नेहमीच तुलना केली जाते. यात अमिताभ बच्चन हे कायम वरचढ असतात. यावरून अभिषेकला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो.
-
वडिलांइतकं बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण न करू शकल्याबद्दल त्याच्यावर टीकाही होते. इतकंच नाही तर, याच गोष्टीमुळे अभिषेकला एकदा त्याच्या चाहत्याचा मारही खावा लागला आहे.
-
अभिषेक बच्चनला एकेदिवशी एका महिलेनं कानशिलात लगावली होती. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्याने स्वतः याबाबत खुलासा केला आहे.
-
अभिषेकनं सांगितलं की, ‘शरारत’ हा चित्रपट पाहिल्यानंतर एका महिलेने गेएटी चित्रपटगृहाच्या बाहेर कानाखाली मारली होती. तिला या चित्रपटातील अभिषेकचं काम आवडलं नव्हतं.
-
इतकंच नाही तर त्या महिलेने अभिषेकला अभिनय सोडून देण्याचा सल्लाही दिला होता. तिचं म्हणणं होतं की, वाईट अभिनय करून अभिषेक आपले वडील अमिताभ बच्चन यांचे नाव धुळीस मिळवत आहे.
-
दिलीप कुमार यांच्यानंतर अभिषेक हा दुसरा अभिनेता आहे, ज्याला अभिनयासाठी सलग तीन वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. ‘मैं प्रेम की दीवानी हूं’ या चित्रपटासाठी सर्वोकृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर अवॉर्ड अभिषेकनं जिंकला होता.
-
अभिषेकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर लवकर तो तमिळ थ्रिलर चित्रपट ‘ओथ्था सेरुप्पु साइज ७’च्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. तसेच अभिषेक रेमो डिसूजा व शूजीत सरकारबरोबरही चित्रपट करणार आहे. शिवाय त्याचा ‘घूमर’ चित्रपटाचेही शूटिंग पूर्ण झाले असून प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.

सोनाली कुलकर्णीचा लेकीसह जबरदस्त डान्स! २२ वर्षांपूर्वीच्या Disco गाण्यावर धरला ठेका, मराठी कलाकारांच्या खास कमेंट्स, पाहा…