-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात हजेरी लावली.
-
यावेळी त्यांनी अनेक राजकीय प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरं दिली.
-
आपण या जगातील सर्वात प्रामाणिक माणूस असल्याचा दावा मी करत नाही, असं ते म्हणाले होते.
-
महाराष्ट्रातील भाजपाचे आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्याशी कसं नातं आहे, याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आलं.
-
या प्रश्नाचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीसांनी एक नाव घेतलं आणि त्यामागचं कारणही सांगितलं.
-
अमित शाह की नरेंद्र मोदी, कुणाशी जास्त मनमोकळेपणाने बोलता? असा प्रश्न अवधूत गुप्तेने देवेंद्र फडणीसांना विचारला.
-
याचं उत्तर देताना फडणवीस यांनी अमित शाहांचं नाव घेतलं.
-
कारण देत फडणवीस म्हणाले, “मोदीजींशी बोलताना एक वडीलकीचं नातं आहे. त्यामुळे मनमोकळं बोलता येतं, पण एक दडपण असतं.”
-
“अमित भाईंशी जे नातं आहे, त्यात काहीही बोलता येतं,” असं फडणवीस म्हणाले. (फोटो – फाईल)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल