-
सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी २ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या केली.
-
त्यांच्यावर तब्बल अडीचशे कोटींचं कर्ज होतं, त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते, अशी माहिती समोर आली.
-
यासंदर्भात एडलवाईस एआरसी कंपनीने एक पत्रक प्रसिद्ध करून नितीन देसाईंच्या कंपनीवर असलेल्या कर्जाचे तपशील उघड केले आहेत.
-
एडलवाईस एआरसीने गुरुवारी नितीन देसाई यांची कंपनी एनडीज आर्ट वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
-
“नितीन देसाई यांच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि या कठीण काळात आम्ही त्यांच्या कुटुंबाप्रती मनापासून शोक व्यक्त करतो,” असं कंपनीने म्हटलं आहे.
-
‘इकोनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, देसाई यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती, असंही कंपनीने त्यांच्या निवेदनात म्हटलं आहे.
-
याबाबत एनसीएलटीच्या मुंबई खंडपीठाने २५ जुलै २०२३ रोजी नितीन देसाई यांची कंपनी ND’s Art World Private Limited विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले होते.
-
आदेशात खंडपीठाने दिवाळखोरीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जितेंद्र कोठारी यांची अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशन म्हणून नियुक्ती केली होती.
-
एनसीएलटीच्या आदेशाविरुद्ध नितीन देसाईंच्या कंपनीने एनसीएलएटीच्या नवी दिल्लीतील खंडपीठामध्ये अपील केले होते. पण ते अपील १ ऑगस्ट २०२३ रोजी फेटाळून लावण्यात आले, असंही पत्रकात म्हटलं आहे.
-
नोव्हेंबर २०१६ मध्ये नितीन देसाई यांच्या कंपनीने १५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
-
त्यानंतर फेब्रुवारी २०१८ मध्ये ईसीएल फायनान्सकडून पुन्हा अतिरिक्त ३५ कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी घेतले.
-
जानेवारी २०२० पासून कर्जाचे हप्ते थकू लागले. त्यांच्या कंपनीवर एकूण २५२ कोटी रुपयांची थकबाकी होती.
-
त्यासाठी जुलै २०२२ मध्ये एनसीएलटीकडे याचिका करण्यात आली होती, असंही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
-
“याप्रकरणी आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करू तसेच कायदेशीर प्रक्रियेचे पालन करू” असेही कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
-
दरम्यान, १ ऑगस्ट रोजी याचिका फेटाळली गेली आणि २ ऑगस्ट रोजी नितीन देसाई यांच्या मृत्यूची बातमी आली.(सर्व फोटो – संग्रहित)

Mumbai Metro: मुंबईतील नव्या मेट्रो स्थानकात किळसवाणं कृत्य; व्हायरल VIDEO वर मुंबईकरांचा संताप