-
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खानचा काल १६ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता.
-
उत्तम अभिनय शैलीमुळे सैफने कलाविश्वामध्ये स्वत:च असे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
‘हम तुम’, ‘ओमकारा’, ‘कल हो ना हो’, ‘हम साथ साथ है’, ‘तान्हाजी’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये सैफने काम केले.
-
‘सिक्रेड गेम्स’ या वेब सीरिजमधून सैफने ओटीटीवर पदार्पण केले होते.
-
सैफची लेक सारा अली खानने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
आपल्या संपूर्ण कुटुंबासह सैफने ५३ वा वाढदिवस साजरा केला आहे.
-
साराने वडिलांसाठी खास केक आणि ‘Best Dad’ लिहलेले फुगे आणले होते.
-
‘माझ्या प्रिय अब्बाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’ असे कॅप्शन साराने या फोटोंना दिले आहे.
-
या फोटोंवर सैफची बहिण सबा पतौडीने ‘Beautiful Pictures’ अशी कमेंट केली आहे.
-
जून महिन्यात सैफचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : सारा अली खान आणि करीना कपूर खान / इन्स्टाग्राम)

तरुणांमध्ये झपाट्याने वाढतोय ‘हा’ कॅन्सर! सुरुवातीलाच दिसतात लक्षणे; दुर्लक्ष न करता खा ‘ही’ ४ फळे, होईल मोठा परिणाम