-
स्टार प्रवाहवर ४ सप्टेंबरपासून ‘प्रेमाची गोष्ट’ ही नवी मालिका सुरु होत आहे.
-
मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत असून नव्या पात्रांना भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
-
सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून एका लक्षवेधी भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
-
‘सावनी’ असं तिच्या भूमिकेचं नाव असून अतिशय ग्लॅमरस असं हे पात्र आहे.
-
‘सावनी’ या पात्राविषयी सांगताना अपूर्वा नेमळेकर म्हणाली, स्टार प्रवाहबरोबर जवळपास ८ वर्षांनी पुन्हा एकदा काम करण्याचा योग जुळून आला आहे.
-
या मालिकेत मी खलनायिका साकारते आहे.
-
खलनायिका जरी साकारत असले तरी या भूमिकेला अनेक कंगोरे आहेत.
-
‘सावनी’ हे पात्र उभं करताना अभिनेत्री म्हणून माझा कस लागतोय.
-
या भूमिकेसाठी मी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी करत आहे.
-
माझ्या लूकवर खूप मेहनत घेतली जाते आहे.
-
मी ‘सावनी’च्या भूमिकेसाठी बरचसं वजनही कमी केलं आहे.
-
‘सावनी’ अतिशय ग्लॅमरस आहे. त्यामुळे साड्यांपासून ते अगदी तिच्या दागिन्यांपर्यंत सगळं खूपच खास असणार आहे.
-
मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अतिशय वेगळी अशी ही भूमिका आहे.
-
प्रेक्षकांनी मला माझ्या प्रत्येक कामात मोलाची साथ दिली आहे.
-
हीच साथ आणि प्रेम माझ्या नव्या मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर / इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?